Budget 2020 : मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मेगाप्लॅन, 'शेतकरी रेल्वे'सारख्या 16 योजना

Budget 2020 :  मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मेगाप्लॅन, 'शेतकरी रेल्वे'सारख्या 16 योजना

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर भर दिला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी 16 कलमी कार्यक्रम जाहीर केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर भर दिला आहे. (Provisions for Farmers in Indian Budget 2020). त्यांनी शेतकऱ्यांसाठी 16 कलमी कार्यक्रम जाहीर केला.आमचं सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं त्या म्हणाल्या. शेती व्यवसायाला स्पर्धात्मक बनवत शेतकऱ्यांचं उत्पन्न निश्चित केलं जाईल. कृषी आणि संलग्न उपक्रम, सिंचन, ग्रामीण विकास क्षेत्रासाठी 2020-21 वर्षासाठी 2.83 लाख कोटी रुपयांचं वाटप करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

सौरऊर्जेचा शेतकऱ्यांसाठी वापर

शेतीपंपांना सौरऊर्जेशी जोडण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. या अंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा उपकरणं दिली जातील. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 100 जिल्ह्यांसाठी व्यापक उपाययोजना केल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. देशभरात शेतकऱ्यांसाठी शीतगृहांची साखळी तयार केली जाणार आहे. यासाठी भारतीय रेल्वे पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तयार करेल. अर्थमंत्र्यांनी शेतकरी रेल्वेचीही घोषणा केली. याचा उपयोग करून नाशवंत शेतीमालाची ने-आण वेगाने करता येईल, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

(हेही वाचा : Budget 2020 : बजेट मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी का नेसली पिवळी?)

आधुनिक शेतजमीन कायदा

शेतकऱ्यांसाठी 6.11 कोटीची विमा योजना असेल. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उथ्थान महाभियान’ (PM KUSUM) 20 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, अशी घोषणा त्यांनी केली.

आधुनिक शेतजमीन कायदा राज्य सरकारद्वारे लागू करण्यात येणार आहे. 100 जिल्ह्यांत पाण्यासाठी मोठी योजना आणली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत कृषी पंपांना सौर ऊर्जेशी जोडण्यात येणार आहे. यामध्ये 20 लाख शेतकऱ्यांचा समावेश असेल. 15 लाख शेतकऱ्यांच्या ग्रीड पंपांना सौर ऊर्जेशी जोडण्यात येईल ही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.

============================================================================

First published: February 1, 2020, 12:31 PM IST

ताज्या बातम्या