नवी दिल्ली, 24 मार्च: लोकसभेत (Loksabha) वित्त विधेयक 2021 (Finance Bill 2021) मंजूर झाले. यामध्ये केंद्र सरकारनेही काही दुरुस्ती केल्या आहेत. भविष्य निर्वाह निधीत (Provident Fund) गुंतवलेल्या रकमेवर मिळालेल्या व्याजावर केंद्र सरकारने कर सवलत मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढविली आहे. दरम्यान ज्यांची कंपनी पीएफमध्ये योगदान देत नाही अशा कर्मचार्यांना ही सूट उपलब्ध असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, भविष्य निर्वाह निधीत गुंतवणूक करणाऱ्या केवळ 1 टक्के लोकांवर याचा परिणाम होईल. त्याचप्रमाणे असंही म्हणाल्या की बाकी लोकांचे पीएफमधील योगदान 2.5 लाख रुपये आहे.
VPF आणि PPF मध्ये गुंतवणूक केल्यास मिळेल सवलत
केंद्र सरकारने बजेट 2021 (Union Budget 2021) मध्ये घोषणा केली होती की, जर तुमच्या ईपीएफ खात्यामध्ये (EPF Account) 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होत असेल तर तुम्हाला अतिरिक्त गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स (Taxable Income) द्यावा लागेल, कारण त्यात नियोक्ता देखील त्याच्याकडून योगादान (Employer Contribution) देतो. दरम्यान तुम्ही निश्चित 12 टक्क्यांच्या अतिरिक्त अतिरिक्त वॉलिंटरी प्रोव्हिडेंट फंड (VPF) आणि पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक केलात तर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या एकूण गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर देखील सूट (Tax Exemption) मिळेल.
(हे वाचा-एप्रिलमध्ये 17 दिवस सुरू असणार बँका, मार्चचा शेवटचा आठवडाही सुट्ट्यांचा)
नवीन व्यवस्थेमुळे जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांवर होईल परिणाम
पीएफमध्ये अधिक योगदान देऊन ज्यांनी कर सूटचा फायदा घेतला त्यांना 2021 च्या अर्थसंकल्पातील घोषणांनी तीव्र धक्का बसला. चांगले उत्पन्न मिळवणारे लोक आतापर्यंत टॅक्स फ्री हेवन म्हणून पीएफचा वापर करत असत, परंतु ही सूट 2021 च्या अर्थसंकल्पात मर्यादित केली गेली. नव्या यंत्रणेअंतर्गत एका वर्षामध्ये अडीच लाखाहून अधिक भविष्य निर्वाह निधी जमा करण्यावर मिळणारे व्याज करांच्या जागेवर येणार होते. उच्च उत्पन्न पगाराच्या लोकांना याचा थेट परिणाम झाला, जे करमुक्त व्याज मिळवण्यासाठी पीएफ वापरत असत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epfo news, Loksabha, Money, Nirmala Sitharaman, Pf, Pf news, PPF, Tax, Union budget