नवी दिल्ली, 23 मार्च: बँकेशी संबंधित तुमची काही प्रलंबित काम असल्यास, या आठवड्यात ती पूर्ण करणे हा चांगला पर्याय ठरेल. बँकांच्या मार्च 2021 च्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अनेक सुट्ट्या (Bank Holidays) आहेत. एप्रिल 2021 मध्येही बँका केवळ 17 दिवस उघडतील. बँका 27 मार्च ते 4 एप्रिल 2021 दरम्यान दोनच दिवस उघडेल. 27 मार्च रोजी महिन्याच्या चौथ्या शनिवारी (4th Saturday) बँका बंद राहतील. दुसर्या दिवशी रविवार असल्याने सुट्टी असेल. या दोन्ही दिवशी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत बँका बंद राहतील. यानंतर 29 मार्च अर्थात सोमवारी होळीची (Holi Festival) सुट्टी असेल. 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी ग्राहकांना मिळणार नाही बँक सेवा होळीनिमित्त बिहारच्या पाटणामध्ये सलग चार दिवस बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI Reserve Bank of India) अधिकृत वेबसाइटनुसार ग्राहकांना पाटणामध्ये 30 मार्च 2021 रोजी शाखेत जाता येणार नाही. महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील बँक ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर या सुट्ट्यांसदर्भातील माहिती तपासून घेऊ शकतात. (हे वाचा- लॉकडाउनमुळे आर्थिक बाजू डळमळीत? या 4 सोप्या मार्गांनी मिळवा पैसे ) दुसर्या दिवशी म्हणजेच 31 मार्च चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सुट्टी नसूनही ग्राहकांची कामे होणार नाहीत. एप्रिल 2021 मध्ये, बँकेचा पहिला कामकाजाचा दिवस 3 तारखेला असेल. 1 एप्रिल रोजी बँकाच्या वार्षिक अकाउंट्सचे क्लोजिंग असल्याकारणाने ग्राहकांना सेवा मिळणार नाही. त्यानंतर 2 एप्रिल रोजी शुक्रवारी गुड फ्रायडे (Good Friday) ची सुट्टी असेल. यानंतर 4 एप्रिल रोजी रविवार आहे. सर्व राज्यात सारख्या सुट्ट्या नाहीत एप्रिल महिन्यात 17 दिवस कामकाज असणार, याचा अर्थ असा नव्हे की सर्व राज्यांमध्ये 13 दिवस सुट्ट्या असतील. तेलुगू नववर्ष, बिहू, गुढीपाडवा, वैशाख, बिजू फेस्टिव्हल आणि उगाडी निमित्त 13 एप्रिल रोजी बँकांना सुट्टी असेल. यानंतर दुसऱ्या दिवशी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी असेल. त्यानंतर काही राज्यांमध्ये हिमाचल डे, विशु, बंगाली न्यू ईयर, सरहुलनिमित्त 15 एप्रिल रोजी सुट्टी असेल. यानंतर 21 एप्रिल रोजी रामनवमी (Ramanavami) आणि 25 एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त सुट्टी असेल. शिवाय सर्व बँकांना 10 आणि 24 एप्रिल रोजी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल. तर 4, 11 आणि 11 एप्रिल रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.