नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर: ज्या सणानिमित्त देशभरात उत्साहच उत्साह असतो, तो दिवाळसण (Diwali 2021) नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसातच आहे. या महिन्यातही भरपूर बँक हॉलिडे असणार आहे. साप्ताहिक सुट्ट्यांसह (Bank Holidays in November 2021) एकूण 17 दिवस बँका पुढच्या महिन्यात बंद (Bank Holiday List) राहणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छठ पूजा, गुरुनानक जयंती असे महत्त्वाचे दिवस आहेत. यादिवशी बहुतांश राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे.
नेमके तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी बँकेत गेलात तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. त्यामुळे त्याआधी कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या आहेत हे जाणून घ्या. या बँक हॉलिडेमुळे तुमच्या बँकिंगविषयीच्या कामात अडथळा येऊ शकतो. अर्थात प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये (upcoming bank holidays list) वेगवेगळे असतात, कारण काही सण-समारंभ असे असतात की जे ठराविक राज्यातच साजरे केले जातात. ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.
वाचा-Elon Musk यांच्या संपत्तीत एका दिवसात मोठी वाढ; आकडा ऐकून थक्क व्हाल!
नेगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स कायद्याअंतर्गत 11 दिवसांची सुट्टी
बँक ग्राहकांना बँकेशी संबंधित एखादे काम उरकायचे असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. आरबीआयने निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स कायद्याअंतर्गत 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 या तारखांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय एकूण 4 रविवार तसंच दुसरा आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असणार आहे.
कुठे तपासाल सुट्ट्यांची यादी?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holiday List) जारी केली जाते. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही सुट्ट्यांची यादी तपासू शकता. प्रत्येत महिन्याची यादी याठिकाणी पाहता येईल. आरबीआयच्या वेबसाइटवर ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची (Bank Holidays List October 2021) यादी तुम्हाला तपासता येईल. या 21 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. या दरम्यान काही ठिकाणी तर सलग पाच दिवस देखील बँका बंद आहेत.
वाचा-म्हणे, 'जितका जास्त खर्च तितकी जास्त पैशांची बचत', महिलेचा विचित्र सेव्हिंग फंडा
कधी आहेत सुट्ट्या?
>> दिवाळी पूजेच्या निमित्ताने 4 नोव्हेंबरला बेंगळुरू वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
>> अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनऊ, मुंबई आणि नागपूरमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजे/बलिप्रतिपदेच्या दिवशी बँका बंद राहतील.
>> गंगटोक, इम्फाळ, कानपूर, लखनऊ आणि शिमला येथील बँका 6 नोव्हेंबर रोजी भाऊबीज, चित्रगुप्त जयंती, निंगोल चकोबा असल्याने बंद राहतील
>> पाटणा आणि रांचीमध्ये 10 नोव्हेंबरला छठपूजेनिमित्त बँका बंद राहणार आहेत.
>> 11 नोव्हेंबरला छठपूजेच्या निमित्ताने पाटण्यात बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
>> शिलाँगमधील सर्व बँका 12 नोव्हेंबर रोजी वंगला उत्सवानिमित्त बंद राहतील.
वाचा-नियमित पेन्शन हवी असल्यास पूर्ण करा हे काम, 30 नोव्हेंबर आहे डेडलाइन
>> 19 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमेला बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
>> कनकदास जयंतीच्या दिवशी 22 नोव्हेंबरला बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील
>> 23 नोव्हेंबरला सेंग कुत्स्नामच्या निमित्ताने शिलाँगमधील बँका बंद राहतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank holidays, Rbi, Rbi latest news