Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कसं शक्य आहे? म्हणे, 'जितका जास्त खर्च तितकी जास्त पैशांची बचत', महिलेची विचित्र Saving Tips

कसं शक्य आहे? म्हणे, 'जितका जास्त खर्च तितकी जास्त पैशांची बचत', महिलेची विचित्र Saving Tips

जास्तीत जास्त खर्च करून ही महिला जास्तीत जास्त बचत कशी करते पाहा.

जास्तीत जास्त खर्च करून ही महिला जास्तीत जास्त बचत कशी करते पाहा.

जास्तीत जास्त खर्च करून ही महिला जास्तीत जास्त बचत कशी करते पाहा.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 26 ऑक्टोबर : सामान्यपणे जास्तीत जास्त पैसे बचत करण्यासाठी (Saving Money) कमीत कमी खर्च करा असं सांगितलं जातं  (Money Saving tricks). पण एक महिला मात्र जास्त खर्च करून जास्त बचत करते (Spend more to save more). असं सांगितलं जातं (Money Saving tricks). महिलेच्या विचित्र सेव्हिंग टिपमुळे सर्वजण हैराण झाले आहेत (Weird way to save money).

पैसे कमवायला (Earning Money) आणि ते बचत (Saving Money) करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. पैसे कमवणं तर सोपं आहे पण पैशांची बचत अवघड. सेव्हिंगसाठी चांगल्या पर्यायाच्या शोधात सर्वजण असतात (Money Saving Options).  अमेरिकेच्या बोस्टनमध्ये राहणारी लेखिका आणि अर्थतज्ज्ञ केली रोबर्गने (Kali Roberge) लोकांना आपली सेव्हिंग टेक्निक सांगितली आहे. बिझनेस इन्साइडरमध्ये केलीचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. ज्यात तिने याबाबत माहिती दिली आहे.

केलीने सांगितलं, माझ्या आईवडिलांनी मला लहानपणापासून शिकवलं जे पैसे तुमचे नाहीत ते तुम्ही खर्च करू शकत नाही. मी याला माझ्या आयुष्याचा मूलमंत्र मानलं. त्यामुळे मी माझ्यावर एक रुपयाचाही कर्ज नव्हतं. मला जितकी गरज होती त्यापेक्षा कमी खर्च मी करायचे. वयाच्या एकविसाव्या वर्षापासूनच मी बचत करायला सुरुवात केली. मी माझा निम्मा पगार सेव्ह करायची.

हे वाचा - खाऊन खाऊन थकाल पण पदार्थ संपणार नाहीत; परवडणाऱ्या दरात या हॉटेलात अनलिमिटेड खा

केलीने सांगितलं की एका कालावधीनंतर ती पैशांना मर्यादित संसाधन नव्हे तर काही गरजा पूर्ण करण्याचा एक मार्ग म्हणून पाहू लागली. जास्त बचत करण्यासाठी जास्त पैसे कमवू लागली, त्यासाठी तिला जास्त काम करावं लागायचं आणि त्यासाठी जास्त मेहनत. यामळे तिचा वेळ, ऊर्जा वाया जात असल्याचं आणि कुटुंबाला ती वेळ देऊ शकत नसल्याचं समजलं. तेव्हा तिने स्वयंपाक, घराची साफसफाई आणि बागकामासाठी माणसं ठेवली. जी कामं ती स्वतः करायची त्यासाठी ती महिन्याला 54 हजार रुपये खर्च करू लागली.

पण आता जी वेळ आणि ऊर्जा ती घरातल्या इतर कामांमध्ये लावायची ती आता ती आपली काम आणि नव्या प्रोजेक्टसाठी वापरते. यामुळे घरावर ती जितका खर्च करायची त्यापेक्षा किती तरी जास्त ती त्या वेळेत काम करून कमवू लागली. अशा पद्धतीने ती घरातील प्रत्येक गोष्टीवर खर्च करून जास्त पैसे बचतही करू लागली.

हे वाचा - कंजूसपणाची तर हद्दच झाली! पैसे वाचवण्यासाठी ही महिला करतेय काय काय; वाचूनच हैराण व्हाल

छोटे छोटे खर्च वाचवण्यासाठी आपली किमती ऊर्जा आणि वेळ वाया घालावू नका. कारण ऊर्जा आणि वेळ याच्या मदतीने तुम्ही जास्त पैसे कमवू शकता, असा सल्ला केलीने सर्वांना दिला आहे.

First published:

Tags: Lifestyle, Money, Savings and investments