मुंबई, 26 ऑक्टोबर : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. टेस्ला इंकचे (Tesla Inc) मालक एलॉन मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात झालेले वाढ चकीत करणारी आहे. एका दिवसात मोजताही येणार नाही एवढी संपत्ती एलॉन मस्क यांची एका दिवसात वाढली आहे. एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 36.2 अब्ज डॉलरने वाढली वाढली आहे. Bloomberg Billionaires Index नुसार, एलॉन मस्क यांची संपत्ती सोमवारी 288.6 अब्ज डॉलरवर पोहोचली.
एलॉन मस्क यांचा एका दिवसाचा नफा रुपयात पाहिल्यास अवघ्या एका दिवसात 2.71 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. Hertz Global Holdings ने 1 लाख टेस्ला कारची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरनंतर, टेस्लाचे शेअर्स 14.9 टक्क्यांनी वाढून 1045.02 डॉलरवर पोहोचले. यासह ती जगातील सर्वात महागडी ऑटो कंपनी बनली.
रिक्षा चालकाला भरावे लागणार 3 कोटी रुपये, INCOME TAX ने पाठवली नोटीस; वाचा सविस्तर
Refinitiv नुसार, Tesla ची मार्केट कॅप प्रथमच 1 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. या कंपनीत मस्कची 23 टक्के भागीदारी आहे. त्यानुसार, त्यांच्या शेअर्सचे एकूण मूल्य 289 अब्ज डॉलर आहे. याशिवाय, मस्क हे रॉकेट निर्माता स्पेसएक्सचे (SpaceX) प्रमुख शेअरहोल्डर आणि सीईओ आहेत. मस्कची एकूण संपत्ती $288.6 अब्ज आहे, जी आता Exxon Mobil Corp. किंवा Nike Inc च्या बाजार मूल्यापेक्षा जास्त आहे.
INTERESTING! जर्मनीत दरमहा येतात दोन लाईट बिलं, पद्धत आहे अनोखी
टेस्ला वेगाने 1 लाख कोटी डॉलर मार्केट कॅप गाठणारी दुसरी कंपनी ठरली. टेस्ला ही ऑटो कंपनी जून 2010 मध्ये लिस्ट झाली आणि 11 वर्षांत टेस्लाने 1 ट्रिलियन डॉलरची मार्केट कॅप गाठली. यापूर्वी हा पराक्रम फेसबुकने केला होता. मात्र आता त्याची मार्केट कॅप 1 ट्रिलियन डॉलरच्या खाली आहे. गेल्या दोन महिन्यांत फेसबुकच्या शेअर्सच्या प्रचंड विक्रीमुळे मार्केट कॅप खाली आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elon musk, Share market, Tesla