पॅन-आधार लिंक करण्यासाठी केवळ 8 दिवस शिल्लक, अन्यथा असा बसेल आर्थिक फटका

पॅन-आधार लिंक करण्यासाठी केवळ 8 दिवस शिल्लक, अन्यथा असा बसेल आर्थिक फटका

तुमचे आधार आणि पॅनकार्ड आधार कार्ड लिंक करण्यात आले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आता अवघे 8 दिवस शिल्लक राहिले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जून : तुमचे आधार आणि पॅनकार्ड आधार कार्ड लिंक करण्यात आले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आता अवघे 8 दिवस शिल्लक राहिले आहे. तत्पूर्वी तुम्ही तुमचे पॅन आणि आधार लिंक नाही केले तर याचा आर्थिक फटका बसू शकतो. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळामध्ये (Aadhar Card) आणि पॅन (Permanent Account Number PAN) लिंक करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली होती. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) पॅन-आधार लिंकिंगची डेडलाइन वाढवून आता 30 जूनपर्यंत मुदत देऊ केली आहे. दोन्ही दस्ताऐवज जोडण्याची तारीख 31 मार्चपर्यंत होती. दरम्यान यामध्ये आता बदल करण्यात आला असून सरकारकडून आता नवव्यांदा हा अवधी वाढवण्यात आला आहे.

(हे वाचा-या बँकेने ग्राहकांसाठी सुरू केली खास सेवा! मिळेल 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज)

इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठीसुद्धा आधार-पॅन लिंकिंग बंधनकारक आहे. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा थांबवायचा असेल तर आधार-पॅन लिंक करणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाकडून इशारा देण्यात आला होता की, पॅन-आधार लिंक न केल्यास पॅनकार्ड रद् करण्यात येईल. मात्र आता ही तारीख आता वाढवण्यात आल्याने ज्यांनी हे काम पूर्ण केले नाही आहे, त्यांना दिलासा मिळाला होता.

(हे वाचा-11 दिवसांत 1800 रुपयांनी वाढल्या सोन्याच्या किंमती, 53 हजारांवर जाऊ शकतात दर)

मात्र डेडलाइन आधी तुम्ही हे दोन दस्तावेज लिंक केले नाही तर तुम्हाला दंड देखील बसू शकतो. आयकक कायदा 272B अंतर्गत तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड देखील बसू शकतो. आयकर कायद्या अंतर्गत काही गैरसोयींना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. उदाहरणार्थ तुम्हाला 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यातून काढायची आहे किंवा भरायची आहे, तर त्याकरता पॅन कार्ड आवश्यक आहे. आधारशी लिंक न केल्यामुळे तुमचे पॅन निष्क्रिय राहील. परिणामी हा व्यवहार तुम्हाला पूर्ण करता येणार नाही.

आधार-पॅन लिंकिंग कसं कराल?

-आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा.

-तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या.

-तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर 'लिंक आधार' पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल.

(हे वाचा-सामान्यांना फटका! 46 वर्षात पहिल्यांदा 7 टक्क्यांच्या खाली येऊ शकतात PPF व्याजदर)

-'View Link Aadhaar Status'  वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल

-याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते.

-UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.

First published: June 22, 2020, 5:35 PM IST

ताज्या बातम्या