मराठी बातम्या /बातम्या /मनी /

या बँकेने कोट्यवधी ग्राहकांसाठी सुरू केली खास सेवा! मिळेल 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज

या बँकेने कोट्यवधी ग्राहकांसाठी सुरू केली खास सेवा! मिळेल 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज

आता ते दिवस गेले आहेत, जेव्हा कर्ज मिळण्यासाठी एक-एक महिन्याचा कालावधी जात असे. खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) आजपासून शिक्षण कर्ज त्वरित (Education Instant Loan) मिळू शकते.

नवी दिल्ली, 22 जून : आता ते दिवस गेले आहेत, जेव्हा कर्ज मिळण्यासाठी एक-एक महिन्याचा कालावधी जात असे. खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) आजपासून शिक्षण कर्ज त्वरित (Education Instant Loan) मिळू शकते. विद्यार्थ्यांना एक कोटीपर्यंत लोनची परवानगी मिळाली आहे. बँकेने त्यांच्या एका निवेदनात सांगितले आहे की, या सुविधेअंतर्गत कोणतीही व्यक्ती त्यांची मुलं, भाऊ-बहिण यांच्याकरता जगभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयामध्ये अभ्यास करता येणं शक्य आहे. आयसीआयसीआय बँकेची एज्यूकेशन लोनसाठी एक कोटींची ऑफर आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन पार पडणार आहे. जाणून घ्या यासंगदर्भातील अधिक माहिती. हे कर्ज घेण्याचे फायदे ग्राहक त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या 90 टक्के पर्यंत आयसीआयसीआय बँकेत कर्जासाठी अप्लाय करू शकतात. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्जाची रक्कम 10 लाख ते 1 कोटी असेल. तर देशांतर्गत संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कर्जाची रक्कम 10 ते 50 लाख आहे. इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून 10 वर्षांपर्यंत लोन रिपेमेंटसाठी कालावधी निवडता येईल. 8 वर्षांपर्यंतच्या एज्यूकेशन इन्स्टा लोनच्या पूर्ण रकमेवरील देय व्याज, आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80 ई अंतर्गत येते. ज्याअंतर्गत करातून सवलत मिळवणे शक्य आहे. असा करा कर्जासाठी अर्ज -सर्वप्रथम आयसीआयसीआय बँकेच्या इंटरनेट प्लॅटफॉर्मवर लॉग इन करा -याठिकाणी कर्जाची रक्कम, repayment tenure, कॉलेज / विश्वविद्यालयाचे नाव, कालावधी यांसारखे रकाने भरावे लागतील. यानंतर तुम्हाला आपोआप तुमचा मासिक ईएमआय किती येईल हा सांगण्यात येईल. (हे वाचा-सामान्यांना फटका! 46 वर्षात पहिल्यांदा 7 टक्क्यांच्या खाली येऊ शकतात PPF व्याजदर) -विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख, विद्यार्थ्याशी असणारे तुमचे नाते इ. माहिती देखील भरावी लागेल. नियम व अटी मान्य केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल. यानंतर प्रोसेसिंग फी भरल्यानंतर स्कीकृती पत्र मिळेल. -अंतिम मंजूरी पत्र तुम्हाला रजिस्टर्ड मेलच्या माध्यमातून मिळेल. -कर्जाच्या अंतिम disbursement साठी ग्राहकांना पत्राच्या मेलमध्ये उल्लेख केलेल्या संबंध प्रबंधकाशी संपर्क करावा लागेल. प्रवेश पत्र, आर्थिक दस्तावेज आणि स्वाक्षरी ही कागदपत्र एकत्र केल्यानंतर, बँक शिक्षण संस्थांना कर्जाची रक्कम देईल. कागदपत्र जमा करण्यासाठी ग्राहक आयसीआयसीआय बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये देखील जाऊ शकतात (हे वाचा-11 दिवसांत 1800 रुपयांनी वाढल्या सोन्याच्या किंमती, 53 हजारांवर जाऊ शकतात दर)
First published:

Tags: ICICI bank

पुढील बातम्या