मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सामान्यांना मोठा फटका! 46 वर्षांनंतर पहिल्यांदा 7 टक्क्यांच्या खाली येऊ शकतात PPF व्याजदर

सामान्यांना मोठा फटका! 46 वर्षांनंतर पहिल्यांदा 7 टक्क्यांच्या खाली येऊ शकतात PPF व्याजदर

कोरोनाच्या या संकटकाळात सामान्य नागरिकांना आणखी एक मोठा झटका लागू शकतो. केंद्र सरकार पुन्हा एकदा छोट्या बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये कपात करण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या या संकटकाळात सामान्य नागरिकांना आणखी एक मोठा झटका लागू शकतो. केंद्र सरकार पुन्हा एकदा छोट्या बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये कपात करण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या या संकटकाळात सामान्य नागरिकांना आणखी एक मोठा झटका लागू शकतो. केंद्र सरकार पुन्हा एकदा छोट्या बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये कपात करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 22 जून : कोरोनाच्या या संकटकाळात सामान्य नागरिकांना आणखी एक मोठा झटका लागू शकतो. केंद्र सरकार पुन्हा एकदा छोट्या बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये कपात करण्याची शक्यता आहे. याअंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF-Public Provident Fund) मध्ये देखील कपात केली जाऊ शकते. मीडिया अहवालांनुसार जर असे झाले तर पीपीएफवर मिळणारे व्याज 7 टक्क्यांच्या देखील खाली जाईल. परिणामी हा व्याजदर 46 वर्षानंतर सर्वात कमी व्याजदर असेल. 1974 साली PPF वर मिळणारे व्याजदर 7 टक्क्यांपेक्षा कमी झाले होते. सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी पीपीएफमध्ये कमीतकमी रक्कम भरण्याची तारीख 30 जूनपर्यंत वाढवली आहे. याआधी ही  मुदत 30 मार्च 2020 होती. जर तुम्ही कमीतकमी रक्कम 500 रुपये जर या महिन्याच्या अखेरपर्यंत नाही भरले तर दंड भरावा लागेल. एप्रिल महिन्यात कमी केले होते विविध योजनांचे व्याजदर पीपीएफचे व्याजदर याआधी एप्रिल महिन्यात 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांवर घसरले होते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे दर 8.6 टक्क्यांवरून 7.4 टक्के करण्यात आले होते. (हे वाचा-'द्वेष आणि भीती पसरवू नका', संकटकाळात मार्ग दाखवणारी रतन टाटा यांची पोस्ट VIRAL) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचे दर 7.9 टक्क्यांवरून 6.8 टक्के तर सुकन्या समृद्धी खात्याचे व्याजदर 8.4 टक्क्यांवरून 6.9 टक्के केले होते. 46 वर्षांत पहिल्यांदा घडेल असं इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार पीपीएफ व्याजदर 7 टक्क्यापेक्षा खाली घसरू शकतात. गेल्या 46 वर्षात PPF व्याजदर इतक्या खालच्या पातळीवर पोहोचले नाही आहेत. यामागील महत्त्वाचे कारण बॉन्ड यील्डमध्ये घसरण सांगण्यात येत आहे. याचा अर्थ असा की छोट्या बचत योजनांच्या (Small Saving Scheme) मध्ये कपात केली जाऊ शकते. (हे वाचा-लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या कंपन्यांना सरकारचा मोठा दिलासा,घेतला महत्त्वाचा निर्णय) या योजनांचे व्याजदर तिमाहीने निश्चित केले जातात. पुढील आठवड्यात हे बदल होणार आहेत. छोट्या बचत योजनांचे व्याजदर सरकारत्या बॉन्ड यील्डशी लिंक्ड असतात. पीपीएफचे दर 10 वर्षांच्या सरकारी बॉन्डच्या यील्डशी लिंक्ड आहेत. एप्रिल ते जून या तिमाही साठी व्याजदर 7.1 टक्के होता. पीपीएफबरोबर छोट्या बचत योजनांचे व्याजदर का घटणार? एप्रिल महिन्यात व्याजदरामध्ये मोठी कपात झाली होती. एक एप्रिलपासून 10 वर्षांच्या बॉन्डची यील्ड सरासरी 6.07 टक्के राहिली आहे. आता ते 5.85 टक्के आहे. त्यामुळे छोट्या बचत योजनांचे व्याजदर कमी होऊ शकतात. याचा परिणाम पीपीएफ आणि सुकन्या योजनेतील गुंतवणुकीवर होईल. छोट्या बचत योजनांचे व्याजदर बँक डिपॉझिटच्या दरांनुसार कमी होत आहेत. छोट्या कालावधीच्या एफडीवर काही वेळा बचत खात्यांइतकेच दर मिळत आहेत. (हे वाचा-Cyber Attack: ग्राहकांना SBIचा इशारा! या चुकीमुळे तुमचे खाते होऊ शकते रिकामे)
First published:

Tags: Open ppf account, PPF

पुढील बातम्या