मराठी बातम्या /बातम्या /मनी /Amazon च्या कर्मचाऱ्यांवरील संकट कायम! 2300 जणांना वॉर्निंग नोटीस

Amazon च्या कर्मचाऱ्यांवरील संकट कायम! 2300 जणांना वॉर्निंग नोटीस

ई-कॉमर्समधील दिग्गज Amazon कंपनीच्या सुमारे 2,300 कर्मचार्‍यांना कंपनीच्या वॉर्न अ‍ॅक्ट अंतर्गत नोकऱ्या कपातीची वॉर्निंग नोटीस मिळाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता ही वाढली आहे.

ई-कॉमर्समधील दिग्गज Amazon कंपनीच्या सुमारे 2,300 कर्मचार्‍यांना कंपनीच्या वॉर्न अ‍ॅक्ट अंतर्गत नोकऱ्या कपातीची वॉर्निंग नोटीस मिळाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता ही वाढली आहे.

ई-कॉमर्समधील दिग्गज Amazon कंपनीच्या सुमारे 2,300 कर्मचार्‍यांना कंपनीच्या वॉर्न अ‍ॅक्ट अंतर्गत नोकऱ्या कपातीची वॉर्निंग नोटीस मिळाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता ही वाढली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 जानेवारी: सध्या देशासह जगभरातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली जातेय. Amazon कर्मचाऱ्यांना देखील आता या संकटाचा सामना करावा लागत आहे. जानेवारी 2023 च्या पहिल्याच आठवड्यामध्ये कंपनीने जवळपास 18 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचे संकेत दिले होते. आता वृत्त आहे की, Amazon ने Warn Act अंतर्गतसुमारे 2,300 कर्मचाऱ्यांना वॉर्निंग नोटिसा मिळाल्या आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेशिवाय कोस्टा रिका आणि कॅनडामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.

8 हजार कर्मचाऱ्यांनी गमावली आहे नोकरी

कंपनीचे सीईओ अँडी जस्सी यांनी आधीच 18,000 हून अधिक कर्मचार्‍यांची नोकरी धोक्यात असल्याचे संकेत दिले होते. त्याचा परिणाम जानेवारी 2023च्या पहिल्या आठवड्यात दिसून आला, कारण नवे वर्ष सुरु होताच कंपनीने कर्मचार्‍यांच्या संख्येत 2 टक्के कपात केली. यानंतर सुमारे 8 हजार कर्मचार्‍यांना आपली नोकरी गमवावी लागली होती.

सर्वात स्वस्त होम लोन कुठे मिळेल? जाणून घ्या डिटेल्स

नोकऱ्यांवर टांगती तलवार

कंपनीच्या सीईओने आधीच संकेत दिले आहेत की, 18 हजार लोक त्यांच्या नोकऱ्या गमावतील. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आठ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतरही छाटणीची लाट कायम आहे. आता तर 2300 कर्मचाऱ्यांना वॉर्निंग नोटिसही बजावण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात कंपनीत काम करणाऱ्या आणखी लोकांना नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे.

PF संदर्भात कोणतेही अडकलेले काम लगेच होईल पूर्ण, फॉलो करा ही प्रोसेस! 

टेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर संकट

जगभरातील मोठ्या टेक कंपन्या एकामागून एक नोकर कपात करत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. नुकतीच मायक्रोसॉफ्टने देखील सुमारे 11 हजार लोकांना कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टमधील या छाटणीचा परिणाम कंपनीच्या इंजीनियरिंग विभागावर होणार आहे, म्हणजेच कंपनीच्या या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना छाटणीचा फटका बसणार आहे.

मायक्रोसॉफ्टने 36 टक्के लोकांना कामावर घेतले होते आणि आता कंपनीने फक्त 5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पण कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनीही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागात लोकांना कामावर घेणार असल्याची माहिती दिली होती.

First published:

Tags: Amazon, Business News