आपले स्वतःचे घर असावे असे सर्वांचेच स्वप्न असते. अशा वेळी आपण सर्वात स्वस्त होम लोन कुठे मिळेल याचा शोध घेतो. याविषयीच सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेपो रेटमध्ये अनेक वेळा वाढ झाल्याने होम लोनच्या व्याज दरात जास्त वाढ झाली आहे. लोनवरील व्याज वाढल्याने ईएमआयमध्ये देखील वाढ झाली आहे.
तुम्ही देखील स्वस्त होमचा शोध घेत असाल तर आज आपण त्याविषयीच माहिती घेणार आहोत. कोणती बँक तुम्हाला स्वस्त होम लोन देत आहे आणि एक लाख रुपये कर्जावर तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल याविषयी देखील आपण आज जाणून घेणार आहोत.
पंजाब नॅशनल बँक होम लोनवर किमान 8.75% व्याजाने कर्ज देत आहे. त्यांचे दर 8 डिसेंबर 2022 रोजी अपडेट करण्यात आले होते. यापूर्वी हा दर 8.40% होता. अॅक्सिस बँक गृहकर्जावर 8.95 टक्के शुल्क आकारत आहे, जे पूर्वी 8.60 टक्के होते.
HDFC बँक होम लोनवर किमान 9.50 टक्के व्याजाने गृहकर्ज देत आहे, जे पूर्वी 8.60 टक्के होते. त्याचप्रमाणे इंडियन बँकेचा होम लोन व्याजदर 9.65 टक्क्यांवर गेला आहे, जो 8 डिसेंबरपूर्वी 8.60 टक्के होता.
बँक ऑफ बडोदा होम लोनवर 10.20 टक्के व्याज घेत आहे. जे 8 डिसेंबरपूर्वी 8.60 टक्के होते. SBI टर्म लोन किमान गृहकर्जावर 9.40 टक्के व्याज आकारले जात आहे, तर ICICI बँक 9.70 टक्के व्याज आकारत आहे. 1 लाखावर तुम्हाला किती EMI भरावा लागेल ते पाहूया.
तुम्ही या बँकांकडून 1 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास, वेगवेगळ्या कालावधीसाठी EMI देखील वेगवेगळा असेल. होम लोनवर 8 टक्के व्याज असल्यास 10 वर्षांसाठी मासिक ईएमआय 1,213 रुपये, 9 टक्के व्याजाने 1,267 रुपये, 10 टक्के व्याजाने मासिक हप्ता 1,322 रुपये असेल.
यासोबतच 15 वर्षांच्या कालावधीसाठी 8, 9 आणि 10 टक्के व्याजावर, मासिक ईएमआय अनुक्रमे 956 रुपये, 1014 रुपये आणि 1075 रुपये भरावा लागेल.