वाशिम,8 मार्च: पोटाची खळगी भरण्यासाठी काय हालअपेष्टा सहन करव्या लागतात, हे महिलांच सांगू शकतात. जागतिक महिला दिनी आम्ही आपल्यासाठी बिब्बा (भिलावा ) फोडण्याचं काम करणाऱ्या महिलाची कहाणी घेऊन आलो आहे. धक्कादायक म्हणजे बिव्याच्या घातक तेलामुळे अनेक महिलांचं सौंदर्य बाधित झालं आहे. वाशिम जिल्ह्याच्या अमानी परिसरातील महिला पोटाची खळगी भरण्यासाठी मागील एका शतकापासून बिब्बा फोडण्याचं काम करत आहेत. बिब्याचं घातक तेल या महिलांच्या सौंदर्याला मारक ठरत आहे. बिब्याच्या तेलानं अनेक महिलांना विद्रुप केलं आहे. या महिलांच्या बिबा फोडण्याच्या पारंपरिक पद्धतीच बदल न झाल्यानं या महिला त्याच कामात दररोज खितपत आपलं आयुष्य जगत आहेत. हेही वाचा.. 4 वर्षांपूर्वी जळालं होतं घर, अद्यापही स्मशानात राहून करावा लागतोय जीवनाशी संघर्ष सुका मेव्यामधील महत्त्वाचा घटक असलेली गोडंबी बिब्या पासून तयार होते. विशेषत: हिवाळ्यात ही गोडंबी शक्तिवर्धक मेवा म्हणून वापरल्या जाते. बिब्यापासून गोडंबी वेगळी करण्याचे काम अत्यंत जिकरीचं असून हे काम करणाऱ्या महिलांना कायम स्वरूपी विद्रूप आयुष्य जगावं लागत आहे. बिब्बा फोडत असताना त्यातून उडणाऱ्या तेलामुळे या महिलांच्या शरीरावर अनेक जखमा होऊन सौंदर्याला मोठी बाधा निर्माण होते. या बिब्बा फोडण्यासाठी अजूनतरी एकही यांत्रिक साधन उपलब्ध नसल्यानं पारंपारिक पद्धतीनंच महिलांना हे काम करावं लागत असल्याचं उर्मिला गोरे या यांनी सांगितलं आहे. हेही वाचा.. International Women’s Day - प्रत्येक महिलेने जरूर कराव्यात ‘या’ 10 हेल्थ टेस्ट गोडंबीसाठी लागणाऱ्या बिब्यांचा पुरवठा मध्यप्रदेशातून होतो. प्रति 11 रुपये किलो दराने या बिब्यांची खरेदी करण्यात येऊन ते फोडल्यानंतर त्यातून निघणाऱ्या गोडंबीची गावोगावी फिरून 250 ते 300 रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते. त्यामधून या महिलांना सरासरी 125 ते 150 रुपये मजुरी मिळते. त्यावर त्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह चालतो. या महिलांच्या आरोग्यासाठी आजपर्यंत कुणीही प्रयत्न न केल्यानं अनेक महिलांचं आयुष्य बिब्यासारखं काळवंडलेलं आहे. हेही वाचा.. महाराष्ट्रासाठी लाज आणणारी घटना, तरुणीच्या हत्येनंतर महिलादिनीच करावा लागला आक्रोश
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.