Home /News /maharashtra /

महाराष्ट्रासाठी लाज आणणारी घटना, तरुणीच्या हत्येनंतर महिलादिनीच करावा लागला आक्रोश

महाराष्ट्रासाठी लाज आणणारी घटना, तरुणीच्या हत्येनंतर महिलादिनीच करावा लागला आक्रोश

माओवाद्यांच्या कारवायांनी चर्चेत असलेल्या या जिल्ह्यात महिलादिनीच वेगळ चित्र पाहायला मिळालं.

    गडचिरोली, 8 मार्च : गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 22 महिलांसह अलीकडच्या बेबी मडावी या तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ अतिदुर्गम भागात महिलांनी आक्रोश रॅली काढली. माओवाद्यांच्या कारवायांनी चर्चेत असलेल्या या जिल्ह्यात महिलादिनीच वेगळं चित्र पाहायला मिळालं. माओवाद्यांकडून आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या 22 महिलांच्या हत्येच्या निषेधार्थ आज अतिदुर्गम भागात महिलांनी पाच किलोमीटरपर्यंत आक्रोश रॅली काढून माओवाद्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्याच्या कारवाया गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहेत. या काळात माओवाद्यानी तब्बल 22 महिलांच्या हत्या केल्या आहेत. अलीकडेच नोव्हेंबर महिन्यात बेबी मडावी या तरुणीची माओवाद्यांनी हत्या केली होती. बेबी मडावीसह आतापर्यंतच्या सगळ्या हत्यांच्या विरोधात अतिदुर्गम भागात महीलांनी धोडराज ते इरपनारपर्यंत पाच किलोमीटर रॅली काढून माओवाद्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर बेबी मडावीचं स्मारक बांधून तिथ बेबी मडावीला श्रध्दांजली वाहण्यात आली. जिल्हाभरात तब्बल 58 ठिकाणी पोलीस दलाकडून बेबी मडावी महिला विकास मेळावे घेण्यात आले. त्याला जिल्ह्यातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. हेही वाचा- उभं पीक जळताना पाहून शेतकऱ्याने घेतली धाव, मात्र काळाने त्याच्यावरच घातला घाव दरम्यान, महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. मात्र राज्यातीलच एका भागात वारंवार होणाऱ्या हत्यांमुळे महिलांना रस्त्यावर उतरावं लागलं आहे. यांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचून आगामी काळात माओवाद्यांविरोधात अधिक आक्रमकतेनं मोहीम चालवण्यात येणार का, हे पाहावं लागेल.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Gadchiroli, Gadchiroli maoist

    पुढील बातम्या