जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिकमध्ये मनसेसोबत युती करणार का? गिरीश महाजनांनी दिले उत्तर

नाशिकमध्ये मनसेसोबत युती करणार का? गिरीश महाजनांनी दिले उत्तर

नाशिकमध्ये मनसेसोबत युती करणार का? गिरीश महाजनांनी दिले उत्तर

‘राज ठाकरे आणि आमचे विचार मिळते जुळते आहे. पण, आगामी निवडणुकांसाठी…’

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 06 मार्च : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. भाजप (BJP) आणि मनसे (MNS) एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. पण, मनसेकडून असा कोणताही प्रस्ताव आला नाही, असं म्हणत भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी टाळी देण्यास तुर्तास नकार दिला आहे. गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन नाशिक पालिका निवडणूक  आणि राज्यातील राजकीय मुद्यांवर परखड मत मांडले. ‘मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं मी मास्क वापरणार नाही. त्यांनी मास्क वापरला पाहिजे. पण, तरीही ते मास्क वापरत नाही मात्र मी मास्क नियमित वापरतो, अशी कोपरखळी गिरीष महाजन यांनी राज ठाकरेंनी लगावली. औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक, लॉकडाउन लागण्याची शक्यता तसंच, ‘राज ठाकरे आणि आमचे विचार मिळते जुळते आहे. पण, आगामी निवडणुकांसाठी  मात्र मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही’, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं. ‘नाशिक पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे.  विकासकामांच्या निधीसाठी राज्य सरकारकडून भेदभाव होत आहे. योग्य तो निधी, राज्य सरकार देत नाही म्हणून केंद्र सरकारकडून निधी आणून कामं करत आहोत’, असा आरोपही महाजन यांनी केला. ‘स्फोटकांची गाडी सापडलेल्या गाडीमालक हिरेनला सुरक्षा द्या ही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मागणी केली होती. पण दुपारी त्यांचा मृतदेह सापडला, जर त्यांना वेळीच सुरक्षा दिली असती तर हा प्रकार घडला नसता. राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती चिंता करण्याच्या पलीकडे आहे. पार बोजवारा उडाला आहे’, अशी टीका महाजन यांनी केली. ‘माझ्यासाठी कोणीतरी नवरा शोधा’; 42 वर्षीय अभिनेत्रीला करायचंय लग्न ‘सचिन वाझे निलंबित होते. पण सत्ता बदलली लागलीच वाझे सेवेत दाखल झाले. वाझे यांच्या प्रत्येक हालचाली संशयास्पद आहे’, अशी टाकीही महाजन यांनी केली. जन्मठेपेची शिक्षा ऐकून न्यायालयातूनच फरार झाला बलात्कार प्रकरणातील आरोपी ‘शिवसेना 100+ जागा निवडून येणार म्हणतेय, आमच्या शुभेच्छा आहे. मात्र, निकाल त्यांना उत्तर देईल. आमच्याकडून कोणीही गेले तरी फरक पडत नाही. केलेला विकास हा उत्तर देईल. नाशिक पालिकेत, पुन्हा स्पष्ट बहुमत भाजपला मिळणार आहे, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात