जन्मठेपेची शिक्षा ऐकून न्यायालयातूनच फरार झाला आरोपी, बलात्काराचा होता आरोप

जन्मठेपेची शिक्षा ऐकून न्यायालयातूनच फरार झाला आरोपी, बलात्काराचा होता आरोप

बलात्कार प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली. हे ऐकून आरोपीच्या पायाखालची जमीनच सरकली. अशात संधीचा फायदा घेत आरोपी जितेंद्र भील न्यायालयातूनच फरार झाला.

  • Share this:

भोपाळ 06 मार्च : मध्य प्रदेशच्या राजगड जिल्हा कोर्टात न्यायाधीशांनी पॉक्सोंतर्गत (POCSO) बलात्कार प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली. हे ऐकून आरोपीच्या पायाखालची जमीनच सरकली. अशात संधीचा फायदा घेत आरोपी जितेंद्र भील न्यायालयातूनच फरार झाला. ही घटना राजगड जिल्हा न्यायालयाच्या परिसरातील आहे.

न्यायालयानं पॉक्सो काद्यांतर्गत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी जितेंद्र याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा ऐकताच आरोपी न्यायालयाच्या परिसरातूनच फरार झाला. यानंतर राजगड एसपी प्रदीप शर्मा यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र भीलनं दोन वर्षांपूर्वी मनोरुग्ण असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. यानंतर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानं कुटुंबीयांना तिच्याकडे विचारपूस केली असता मुलीनं या घटनेची माहिती दिली. यानंतर 2018 मध्ये दोन वर्षांनी पीडितेचे कुटुंबीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राजगड ठाण्यात पोहोचले. याच प्रकरणी आरोपीला अटक करणायात आली होती.

सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आलोक श्रीवास्तव यांचं असं म्हणणं आहे, की 2 ऑक्टोबर 2018 ला पीडितेच्या आईनं तक्रार दाखल केली होती, यावेळी मुलगी मानसिक रुग्ण असल्याचंही तिच्या आईनं सांगितलं होतं. आरोपी जितेंद्र भील तिच्यासोबत बळजबरीनं शारिरीक संबंध ठेवत असे. याच कारणामुळे ती गरोदर झाली. पीडितेची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, की ती गर्भवती आहे. तिच्या पोटाचत 15 आठवड्यांचा गर्भ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पीडितेचं म्हणणं आणि डीएनए रिपोर्टच्या आधारावर कोर्टानं आरोपी जितेंद्रला जन्मठेपेची शिक्षी सुनावली आणि 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. मात्र, शिक्षा ऐकल्यानंतर आरोपी फरार झाला.

Published by: Kiran Pharate
First published: March 6, 2021, 1:01 PM IST

ताज्या बातम्या