‘माझ्यासाठी कोणीतरी नवरा शोधा’; 42 वर्षीय अभिनेत्रीला करायचंय लग्न

‘माझ्यासाठी कोणीतरी नवरा शोधा’; 42 वर्षीय अभिनेत्रीला करायचंय लग्न

शमिताचं वय आता 42 वर्ष आहे. त्यामुळे अनेकदा तिला चाहते लग्नाविषयी प्रश्न विचारतात. अखेर वारंवार विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नावर शमितानं उत्तर दिलं. तिनं लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई 6 मार्च: शमिता शेट्टी (Shamita Shetty) ही कधीकाळी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. गेल्या काही काळात ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. शमिताचं वय आता 42 वर्ष आहे. त्यामुळे अनेकदा तिला चाहते लग्नाविषयी प्रश्न विचारतात. अखेर वारंवार विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नावर शमितानं उत्तर दिलं. तिनं लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे. (Shamita Shetty opens up on Marriage Plans)

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शमितानं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं अविवाहित राहण्याचं कारण देखील सांगितलं. ती म्हणाली, “मला लग्न तर करायचं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मी लग्नाची तयारी केली आहे. पण माझा होणारा नवरा कुठे आहे हेच मला माहित नाही. मला अशा व्यक्तीसोबत लग्न करायचंय ज्याच्यासोबत मी आयुष्यभर आनंदी राहू शकेन. असा कुठलाही व्यक्ती मला अद्याप भेटलेला नाही. तुमच्याकडे कोणी असा व्यक्ती असेल तर मला सांगा.”

अवश्य पाहा - सलमान खाननंतरच मी लग्न करणार; या प्रसिद्ध गायकाने व्यक्त केली इच्छा

शमिता ही प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लहान बहीण आहे. तिनं 2000 साली ‘महोब्बतें’ या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिनं इशिका ही व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. या चित्रपटामुळं ती रातोरात सुपरस्टार झाली होती. त्यानंतर ‘साथिया’, ‘मेरे यार की शादी है’, ‘फरेब’, ‘वजह’, ‘कॅश’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु या दरम्यान केवळ ‘जेहेर’ वगळता तिच्या कुठल्याही चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी तिनं आपलं लक्ष छोट्या पडद्याकडे वळवलं. त्यानंतर ती ‘बिग बॉस’, ‘फियर फॅक्टर’, ‘झलक दिखलाजा’ या शोंमध्ये झळकली. अलिकडेच शमितानं ‘ब्लॅक विडो’ या वेब सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील डेब्यू केलं.

Published by: Mandar Gurav
First published: March 6, 2021, 12:39 PM IST

ताज्या बातम्या