औरंगाबाद, 06 मार्च : महाराष्ट्रापुढे (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) संकट नव्याने उभे येऊन ठाकले आहे. मुंबईसह, मराठवाडा आणि विदर्भात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सोमवारपासून लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत 450 रुग्णांची संख्या वाढली आहे.
मुंबई हादरली, 20 वर्षीय मुलाने वडिलांची आणि आजोबांची हत्या करून केली आत्महत्या
अजून मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शहरात सोमवारपासून मिनी लॉकडाउन लागू करण्याची शक्यता आहे. शहरात 10 दिवसांचा लॉकडाउन लागू करण्याची तयारी सुरू आहे. लॉकडाउन लावून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याची प्रशासनाची तयारी सुरू झाली.
47909 जण कोरोनामुक्त, 2910 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात 5 तारखेपर्यंत 179 जणांना (मनपा 152, ग्रामीण 27) सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 47909 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 459 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52103 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1284 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2910 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. महानगर पालिकेच्या हद्दीत 353 रुग्ण आढळले आहे. तर ग्रामीण भागात 106 रुग्ण आढळले आहे.
1 एप्रिलपासून कारममध्ये हे फीचर नसल्यास येईल समस्या, जाणून घ्या सरकारचा नवा नियम
तर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये घाटीत मुकुंदवाडीतील 65 वर्षीय पुरूष, खुलताबाद तालुक्यातील नांदराबाद येथील 66 वर्षीय पुरूष, नंदनवन कॉलनीतील 79 वर्षीय पुरूष, फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार 58 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात 73 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Corona, Lockdown, औरंगाबाद