जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Eknath Shinde : एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार? फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार सुरतच्या हॉटेलमध्ये, एकनाथ शिंदेंची घेतली भेट

Eknath Shinde : एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार? फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार सुरतच्या हॉटेलमध्ये, एकनाथ शिंदेंची घेतली भेट

Eknath Shinde : एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार? फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार सुरतच्या हॉटेलमध्ये, एकनाथ शिंदेंची घेतली भेट

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये (mahavikas aghadi) सत्तेत असलेल्या शिवसेनेमध्ये (shivsena) नाराजीने मोठा राजकीय भुंकप झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : राज्यातील महाविकास आघाडीमध्ये (mahavikas aghadi) सत्तेत असलेल्या शिवसेनेमध्ये (shivsena) नाराजीने मोठा राजकीय भुंकप झाला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ खडसे(shivsena leader eknath khadase) यांनी नाराजी व्यक्त करत जवळपास 35 आमदारांसोबत गुजरातच्या सुरतमध्ये एका हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. दरम्यान या सगळ्याच भाजपची (bjp) भूमिका महत्वाची असल्याने त्यांच्याही राजकीय घडामोडींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. भाजपचे आमदार संजय कुठे (bjp mla sanjay kute) गुजरातमधील सुरत (gujrat, surat hotel) येथे एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाराज आमदारांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. ते या हॉटेलमध्ये नुकतेच पोहोचले असल्याने या घडामोडीला नवे वळण आले आहे.

जाहिरात

दरम्यान भाजप आमदार देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या जवळचे सहकारी सुरतमध्ये पोहोचले आहेत.  संजय कुटे एकनाथ शिंदे यांना काय नेमका निरोप देणार यावर सगळ्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान कुटे यांच्यासोबत आणखी काही असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा :  Congress mla Maharashtra : आता काँग्रेसचे 10 आमदार बाहेर पडणार? विजय वडेट्टीवार यांच्या मनात आहे तरी काय?

दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर बैठकीला बोलावले आहे. या बैठकीच्या निमित्ताने किती आमदार आपल्यासोबत आहे, याची गणना केली जाईल. संख्याबळ किती आहे, हे सिद्ध केलं जाईल.  वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे 35 आमदार असल्याची मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत 20 शिवसेनेचे आमदार असल्याचे स्पष्ट झालं आहे. तसंच एक अपक्ष आमदार सुद्धा शिंदेंच्या सोबत आहे. त्यामुळे एकूण संख्या 21 वर पोहोचली आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  मुख्यमंत्री ठाकरेंनी केलं डॅमेज कंट्रोल, एकनाथ शिंदेंचं बंड ठरणार पेल्यातलं वादळ?

एकनाथ शिंदे यांचे सुचक ट्वीट

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही  असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. याचबरोबर एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढल्याचे सांगण्यात आले आहे.

जाहिरात

काँग्रेसचे 10 आमदार फुटण्याची शक्यता

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांसह बाहेर पडण्याचा तयारीत आहेत. विधानपरिषदेत झालेल्या पराभवानंतर विजय वडेट्टीवार आपल्या 10 आमदारांसोबत बाहेर पडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेपाठेपाठ काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दुफळी दिसून येत आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडेल का यावर शंका व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात