मुंबई 21 जून : काल झालेल्या विधान परिषद निवडणूक (MLC Election Result) निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर महाविकासआघाडीला (mahavikas aghadi) मोठा धक्का बसला आहे. दरम्यान काँग्रेसच्या (congress mlc election) एका उमेदवाराचा पराभव झाल्याने काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान काँग्रेसचे आमदार फुटल्याने काँग्रेसमधील (congress mla Maharashtra) अंतर्गत खदखद निर्माण झाली आहे. यावर मंत्री विजय वडेट्टीवर (minister vijay vadettivar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्येही (congress) नाराजी असल्याचे समोर आले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांसह बाहेर पडण्याचा तयारीत आहेत. विधानपरिषदेत झालेल्या पराभवानंतर विजय वडेट्टीवार आपल्या 10 आमदारांसोबत बाहेर पडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेपाठेपाठ काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दुफळी दिसून येत आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडेल का यावर शंका व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा : ‘कर्मवीर’ एकनाथ शिंदेंवर बंड पुकारण्याची वेळ का आली? काय आहे खरं कारण? संजय राऊतांचा काय आहे संबंध?
दरम्यान यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, महाराष्ट्रात विधानपरिषदेत काँग्रेसच्या आमदारांची कोणती रणनीती ठरली हे मला अजूनही समजली नाह. यासाठी काँग्रेसच्या आमदारांना घेऊन आम्ही बैठक घेणार आहोत. चंद्रकांत हंडोरे यांना प्रथम पसंतीची अनेक मते मिळाली होती. तरीही त्यांना दुसऱ्या पसंतीत फारच कमी मते मिळाली. ही चिंतेची बाब आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक आज बोलावण्यात आली आहे यावर काय निर्णय होतो यावर आम्ही माध्यमांशी बोलणार आहे असे ते म्हणाले.
इतर कोणत्याही पक्षासोबत काय चालले आहे यावर मी भाष्य करणार नाही पण गरज पडल्यास योग्य ठिकाणी चर्चा करूअसेही ते म्हणाले. ही सार्वजनिक चर्चा करण्यासारखी गोष्ट नाही. शिवसेनेतील नाराजी हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या नाराजीबद्दल काहीही बोलणार नाही असे ते म्हणाले.