#WeatherToday : राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, आठवडाभरात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

भिवंडीतमध्ये रात्रीपासून तुफान पाऊस सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे तब्बल दीडशेपेक्षा जास्त दुकानात पाणी शिरलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2019 08:28 AM IST

#WeatherToday : राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, आठवडाभरात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, 17 सप्टेंबर : राज्यात पाऊस पुन्हा कहर घालण्याची शक्यता वातावरणातील बदलांमुळे निर्माण झाली आहे. येत्या आठवड्यात राज्याच्या सर्वच भागात प्रामुख्याने मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 18 ते 20 सप्टेंबर या काळात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

भिवंडीतमध्ये रात्रीपासून तुफान पाऊस सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे तब्बल दीडशेपेक्षा जास्त दुकानात पाणी शिरलं असल्याचं सांगण्यात येत आहे. भिवंडी शहरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असून तिनबत्ती बाजारपेठेत पाणी शिरल्याने संपूर्ण व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा आहे की वाहनंदेखील वाहून चालली असल्याचं चित्र आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. पावसाच्या भीतीने सामान्य नागरिक आणि व्यापारी रात्रभर जागे आहेत. मात्र, महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईमध्ये जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. तर रायगड पट्ट्यातही पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. पण बुधवारी बहुतेक राज्यांत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे मालेगाव, नांदगावसह जळगाव जिल्यातील काही भागाला पाणी पुरवठा करणारे गिरणा डॅम  94 टक्के भरलं आहे. 2007नंतर पहिल्यांदाच धरणात 100 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे नागरिकांना वर्षभर पाण्याची चिंता नसणार आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक साठवण क्षमता असलेलं नांदगांव तालुक्यातील हे धरण आहे. एकीकडे धरणं भरली असताना अनेक भागांत पावसाने पाठ फिरवली आहे.

इतर बातम्या - #NewsToday: आज दिवसभारात घडणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या

Loading...

लातूरकडे पावसानं पाठ फिरवली आहे. ममदापूरमध्ये शिवारात विहरीतून पाणी टँकरमध्ये भरत असताना टँकर विहिरीत पडून ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विहिरीतून पाणी भरत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पालघरमधेही डहाणू आशागड इथल्या धुदंलवाडी रोडवर असलेल्या आंबेसरीमधील पुल पावसामुळे पडला. त्यामुळे वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तलासरी तालुक्यासह उंबरगाव आणि संजाण या भागांनाही हा रस्ता जोडतो. त्यामुळे या भागातील वाहतुक अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

इतर बातम्या - नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का, 'या' मतदारसंघातून शिवसेना लढणार विधानसभा!

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याकडेही पावसानं पाठ फिरवली आहे. पावसाची कृपा व्हावी यासाठी अचकदाणी इथल्या ग्रामस्थांनी जलराज आणि जलपरी या नर मादी माश्यांचा विवाह लावत वरूण राजाला आवाहन केलं आहे. या अनोख्या विवाहाची अनोखी मिरवणूक वाजत गाजत निघाली. विवाह मंडपात दोन काचेच्या पेटीत ठेवलेला नर मासा हा जलराज बनला होता. तर मादी मासा जलपरी झाली होती. सर्वांच्या साक्षीने असा हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला.

इतर बातम्या - समुद्रात सापडला एक विचित्र जीव, 11 लाखापेक्षा जास्त वेळा लोकांनी पाहिला हा VIDEO

तिकडे मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात येत्या 2 दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आले आहे. स्कायमेटनं हा अंदाज वर्तवला आहे. मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील 3 दिवसांत सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी वेधशाळाने हा अंदाज वर्तवला आहे.

VIDEO: 'या' कारणामुळे मनसेला आघाडीमध्ये जागा नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 08:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...