जेनुआ(अलास्का)16 सप्टेंबर : समुद्री विश्व चमत्कारांनी भरलेलं आहे. समुद्रामध्ये बर्याच जीव आणि प्रजातींचा शोध लागला आहे. यात आणखी नवीन शोध लावला जाणार आहे. येणाऱ्या काही काळात समुद्रातून नवीन जीवांचा उदय होत आहे. अलास्काच्या समुद्रात आता असाच एक विचित्र समुद्री प्राणी सापडला आहे. स्टार फिश सारखा असणारा हा प्राणी संपूर्ण जगासाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंत 11 लाखाहून अधिक वेळा पाहिलेला आहे. सराह वेसर (Sarah Vasser)नावाच्या नेटकऱ्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. काहींनी या जीवाला विचित्र असल्याचं म्हटलं आहे तर काहीजण याची तुलना एलियनशी करत आहेत. नारंगी रंगाच्या या ‘एलियन’ मध्ये बर्याच प्रवृत्ती आहेत. शास्त्रज्ञांनुसार या जीवाचं नाव ‘बास्केट स्टार’ आहे. सराह वेसरच्या म्हणण्यानुसार, हा विचित्र प्राणी अलास्काच्या प्रिन्स ऑफ वाल्स आयलँडमधून ऑगस्ट महिन्यात सापडला होता. त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्यापासून याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, हा प्राणी सजीव आहे का? याची काय वैशिष्ट्ये आहेत तर याचा जन्म कसा झाला याचा आता शास्त्रज्ञ शोध घेत आहे. पण तोपर्यंत प्राणी प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, या प्राण्याच्या फक्त रक्तवाहिन्या दिसत आहेत. त्याचा व्हिडिओ 18000 पेक्षा जास्त वेळा शेअर करण्यात आला आहे. एक युजर हा स्टार फिश असल्याचं सांगत आहे तर एकाने लिहलं की, हा एलियन आहे. इतर बातम्या - 24 तासांत तीन MURDER; महिलेची बलात्कारानंतर हत्या, प्रेमसंबंधातून तरुणाला संपवलं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणार्या सराह वेसरने या प्राण्याला कोणतीही हानी न करता पाण्यात सोडण्यात आलं आहे अशी माहिती दिली आहे. न्यूयॉर्कच्या पोस्टनुसार बास्केट स्टार एकिनोडर्मची एक प्रजाती आहे. हे स्टार फिशसारखंच आहे. याच्या लांब दिसणाऱ्या नसांमुळे हा पोहू शकतो. VIDEO: ‘या’ कारणामुळे मनसेला आघाडीमध्ये जागा नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट