वर्धा, 19 जून, नरेंद्र मते : वर्ध्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाचा केक कापताना बर्थडे बॉयच्या तोंडाला आग लागली, या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला. वर्ध्याच्या सिंधी मेघे येथील ही घटना आहे. रितीक वानखेडे असं या बर्थडे बॉयचं नाव आहे. केक कापताना स्प्रे तोंडावर मारला, याचवेळी फायन गनमधून निघालेल्या ठिणगीमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत रितीकच्या कानाला आणि नाकाजवळ किरकोळ जखम झाली आहे. त्याला उपचारासाठी तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. बर्थडे पार्टीमधील धक्कादायक प्रकार घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रितीक वानखेडे यांचा रविवारी बर्थडे होता. त्याच्या बर्थडेनिमित्त सायंकाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला रितीकचे मित्र देखील उपस्थित होते. तो आपल्या मित्रांसोबत केक कापत होता. केक कापताना त्याच्या तोंडावर स्प्रे मारला गेला. याचवेळी फायर गनमधून निघालेली आगेची ठिणगी स्प्रेवर पडली अन् आगीचा भडका उडाला. सुदैवानं आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं मोठा अनर्थ टळला.
वर्ध्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाचा केक कापताना तरुणाच्या तोंडाला आग लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. pic.twitter.com/7lyzratNnB
— News18Lokmat (@News18lokmat) June 19, 2023
किरकोळ जखमी या घटनेत बर्थडे बॉय रितीक हा किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्या कानाला आणि नाकाजवळ किरकोळ जखम झाली आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेत रितीक थोडक्यात बचावला आहे.