Home /News /maharashtra /

कोरोनाबाधितांच्या मदतीला धावला गरीबांचा 'विठ्ठल', मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले एक कोटी

कोरोनाबाधितांच्या मदतीला धावला गरीबांचा 'विठ्ठल', मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले एक कोटी

कोरोना व्हायरस या आजारासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायांने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर, 29 मार्च: कोरोना व्हायरस या आजारासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायांने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. हेही वाचा... आपल्या भाकरीतील अर्धी भाकरी गरजूंना, शेतकऱ्याने मजुरांना वाटले शेतातील गहू सध्या देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक उपाययोजना होत आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने एक कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय 4 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे. तसेच विठुरायांचे मंदिर देखिल 14 एप्रिलपर्यत बंद राहणार आहे. त्यामुळे पंढरीत कुठल्याही भाविकांनी येऊ नये, असे आवाहन यनिमित्ताने करण्यात आले आहे. हेही वाचा...महाराष्ट्रात 1 लाख लोकांना मिळणार 5 रुपयांमध्ये जेवण, सरकारचा मोठा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. पंढरपूरात तसेच राज्यात देखिल कडेकोट बंद आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने पंढरपूरातील प्रशासनास मेडिकल किट हे नागरीकांच्या सुविधेसाठी पुरविले आहे. तसेच शहरातील असंख्य बेघर आणि मागतकऱ्यांना देखिल दररोज फूड पॅकेटस देण्याचे काम होत आहे. हेही वाचा...सांगलीत अवघ्या 2 वर्षांच्या मुलाला झाला कोरोना, मात्र एक दिलासादायक माहिती समोर मदत देण्याचा हा निर्णय घेण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुढाकार घेतला आहे. तर समितीचे सदस्य आमदार राम कदम, आमदार सुजितसिंह ठाकूर, नगराध्यक्षा साधना भोसले, संभाजी शिंदे, शंकुतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, भास्करगिरी महाराज, दिनेशकुमार कदम, माधवी निगडे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, आदींनी या निर्णयास सहमती दर्शवली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Pandharpur, Pandharpur news

पुढील बातम्या