सांगलीत अवघ्या 2 वर्षांच्या मुलाला झाला कोरोना, मात्र एक दिलासादायक माहिती समोर

सांगलीत अवघ्या 2 वर्षांच्या मुलाला झाला कोरोना, मात्र एक दिलासादायक माहिती समोर

महाराष्ट्रात अनेक कोरोनाबाधितांवर उपचार होऊन त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे.

  • Share this:

सांगली, 29 मार्च : सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आत्ता 24 वर गेला आहे. एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाचा विळखा पडला आहे. नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आलेला 2 वर्षांचा मुलगा त्याच कुटुंबातील असून यापूर्वी देखील या घरातील लहान मुलांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. मात्र त्यावेळी ते निगेटिव्ह होते. काल तिघांचे रिपोर्ट पाठवले त्यात एका मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

सांगलीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील नातेवाईकांसह 24 जण आहेत. तर पेट वडगाव येथील महिला इस्लामपूर येथील रुग्णाची नातेवाईक आहे. या सर्व रुग्णांवर मिरजमधील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. मिरजमध्ये उपचार घेणाऱ्या संख्या 25 वर पोहचली आहे.

संख्या वाढत असताना दिलासादायक माहिती

सांगली जिल्हातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण याआधीही महाराष्ट्रात अनेक कोरोनाबाधितांवर उपचार होऊन त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे.

महाराष्ट्रातील आकडा वाढला!

देशभरात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या आज 193 वर पोहोचली आहे. पुण्यात 1, मुंबईत, 4 सांगलीमध्ये 1 तर नागपुरात 1 असे नवीन 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात 28 नवे कोरोनाचे रुग्ण आढऴले होते. शनिवारी 186 वर हा आकडा पोहोचला होता. तर मुंबईमध्ये 108 रुग्णांची शनिवारी नोंद करण्यात आली होती. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या या आकड्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

First published: March 29, 2020, 10:45 AM IST

ताज्या बातम्या