जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / माणुसकीचा गुणाकार! 'माझ्या भाकरीतील अर्धी भाकरी गरजूंना', नाशिकच्या शेतकऱ्याने मजुरांना वाटले गहू

माणुसकीचा गुणाकार! 'माझ्या भाकरीतील अर्धी भाकरी गरजूंना', नाशिकच्या शेतकऱ्याने मजुरांना वाटले गहू

माणुसकीचा गुणाकार! 'माझ्या भाकरीतील अर्धी भाकरी गरजूंना', नाशिकच्या शेतकऱ्याने मजुरांना वाटले गहू

नाशिकच्या शेतकऱ्याने 3 एकरातील 1 एकर गहू वाटले मजुरांना म्हणाला, अर्धी भाकरी समोरच्याला देणं हिच संस्कृती

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 29 मार्च : देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केलं आहे. मात्र यामुळे देशातील अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. मात्र त्याचवेळी अनेक मदतीचे हातही समोर आले आहेत. नाशिकचा (Nashik) एक तरुण शेतकरी मजुरांच्या मदतीसाठी धावून आला आहे. दत्ता राम पाटील असं या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने आपल्या 3 एकर जमिनीतील 1 एकरातील गव्हाचे गरजूंना वाटप केले आहे. आज सकाळी त्याच्याजवळ काही मजूर मदत मागण्यासाठी आले होते. हाताला काही काम नसल्याने घर कसं चालवायचं, काय खायचं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

जाहिरात

गेल्या अनेक दिवसांपासून या मजुरांकडे काही काम नाही. लॉकडाऊनमध्ये सर्व कामे बंद करण्यात आली आहेत. अशावेळी दिवसाला कमवणाऱ्या या मजुरांनी घरखर्च कसा करायचा हा मोठा प्रश्नच आहे. हे मजुर दररोज दुसऱ्याच्या शेतात काम करुन पैसे कमावतात. मात्र सध्या काम नसल्यामुळे ते पैसे कुठून आणणार? या मजुरांनी दत्ता पाटील यांच्याकडे मदत मागितली होती. यानंतर पाटील यांनी आपल्या 1 एकर जमिनीतील गहू या मजुरांमध्ये वाटले. यावर दत्ता राम पाटील म्हणाले, ‘मी एक साधा शेतकरी आहे. आर्थिकदृष्ट्या मी फार सधन नाही. मात्र माझ्याजवळ जर एक चपाती असेल तर त्यातील अर्धी मी गरजूला देईन.’ संबंधित -  महाराष्ट्रात 1 लाख लोकांना मिळणार 5 रुपयांमध्ये जेवण, सरकारचा मोठा निर्णय

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात