Home /News /maharashtra /

महाराष्ट्रात 1 लाख लोकांना मिळणार 5 रुपयांमध्ये जेवण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

महाराष्ट्रात 1 लाख लोकांना मिळणार 5 रुपयांमध्ये जेवण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

शिवभोजन थाळीच्या वेळेत वाढ केली असून आता 11 ते 3 या वेळेत हे भोजन दिलं जाईल.

    नाशिक, 29 मार्च : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आजपासूनच याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार आहे. शिवभोजन थाळीच्या वेळेत वाढ केली असून आता 11 ते 3 या वेळेत हे भोजन दिलं जाईल. याअंतर्गत रोज 1 लाख लोकांना शिवभोजन दिल जाईल. तसंच ही थाळी आता 10 ऐवजी फक्त 5 रुपयांत मिळणार आहे. 3 महिन्यांकरता ही सवलत असेल,' अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 'शिवभोजन थाळीसाठी 45 रुपये सरकार कडून थाळी केंद्राला दिले जातील. ग्रामीण मध्ये 30 रुपये दिले जातील. 1 एप्रिल ऐवजी ताबडतोब आजच्या आज ही योजना सुरू होणार आहे. शिवभोजन थाळीच्या 5 पट भोजन थाळ्या वाढवून दिलेल्या आहेत. लोकांनी नाशिकमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. गर्दी झालेली असेल तर त्याबाबत तात्काळ कारवाई करत आहेत,' असंही छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद, काय आहेत ठळक मुद्दे? - तेलाच्या काळाबाजर प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश.. - खाद्य तेलांच्या बाबत प्रश्न मार्गी लावलेला आहे.. - तेलाची कमतरता भासणार नाही अशी काळजी घेतो आहोत.. - अन्न धान्यासाठी गोदाम अपूर्ण नाही.. - भाजी घेण्यासाठी गर्दी करू नये.. - अंतरावर काढलेल्या चौकोनात उभं राहून भाजी घ्यावी.. - मास्क घालूनच भाजी घ्यायला या - सर्वसामान्य व्यक्ती,कामगार,मजूर,उद्योगधंदे, अर्थव्यवस्था, सरकार या सगळ्यांना कोरोनाचा मोठा फटका - मात्र,आता कोरोना सोबतची लढाई जिंकणं सगळ्यात महत्वाचं - कोरोनाची भीषणता भयानक आहे - सॅनिटायझर आणी मास्क यांचा तुटवडा नाही - मदतीचे अनेक हाथ पुढे येताय - देशातील आज प्रत्येक जण नरेंद्र मोदी आहे,उद्धव ठाकरे आहे, अजित पवार आहे,छगन भुजबळ आहे ... - प्रत्येकानं जाणिवा जागृत ठेवाव्या - मदतीसाठी पुढे यावं - आपण सर्व सरकार आहोत - ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या