जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चित्रा वाघांच्या धमकीनंतर उर्फीची चाकणकरांकडे धाव; अभिनेत्रीची महिला आयोगात तक्रार दाखल

चित्रा वाघांच्या धमकीनंतर उर्फीची चाकणकरांकडे धाव; अभिनेत्रीची महिला आयोगात तक्रार दाखल

उर्फी जावेद चित्रा वाघ रुपाली चाकणकर

उर्फी जावेद चित्रा वाघ रुपाली चाकणकर

चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी महिला आयोगात दाखल झाली आहे. उर्फीचे वकील सातपुते यांनी चित्रा वाघ यांच्यावर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 जानेवारी: अभिनेत्री उर्फी जावेद मगाच्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्याच चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली होती. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फी जावेद प्रकरणात लक्ष घालणार नसल्याचं स्पष्ट मत मांडलं. यावरून नंतर चित्रा वाघ आणि रूपाली चाकणकर यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. त्यानंतर आता अभिनेत्री उर्फी जावेद स्वत: राज्य महिला आयोगाच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जिथे दिसेल तिथे तिचं तोंड फोडेनं असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी महिला आयोगात धाव घेतली आहे. उर्फीचे वकील सातपुते यांनी चित्रा वाघ यांच्यावर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. उर्फी महिला आयोगात गेल्यानं आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणाला आता कोणतं नवं वळण येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.  मागच्या अनेक दिवसांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. एकीकडे चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर उर्फीचं वाघांना डिवचणं सुरूच होतं. दरम्यान चित्रा वाघांनी केलेल्या वक्तव्यानंतर उर्फीच्या वकिलांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत चित्रा वाघांविरोधात तक्रार दाखल करण्याची मागमी केली आहे. वकिलांनी ऑनलाइन माध्यमातून महिला आयोगाला पत्र लिहित तक्रार दाखल केली आहे. हेही वाचा - Urfi Javed: उर्फी जावेदपेक्षाही जास्त ग्लॅमरस आहेत तिच्या 3 बहिणी; तुम्ही पाहिलात का हे फोटो? ‘महाराष्ट्रात उर्फीचा नंगा नाच खपवून घेतला जाणार नाही. उर्फी दिसेल तिथे तिचं थोबाड फोडेन’, असं चित्रा वाघा यांनी म्हटलं होतं. त्यांना प्रत्युत्तर देत उर्फीनं, ,माझा नंगा नाच असाच सुरू राहणार’, असं म्हटलं होतं.

जाहिरात

टीव्ही 9नं दिलेल्या वृत्तानुसार,  उर्फीच्या वकिलांनी तक्रारीत म्हटलं आहे की, ‘उर्फी जावेदच्या कपडे घालण्याचा स्टाइलवर चित्रा वाघ लोकांना गुन्हे करण्यास प्रवृत्त करत आहेत. चित्रा वाघ आणि त्यांचे समर्थक उर्फीला ट्रोल करून तिची प्रतिमा खबार करत आहेत. इतकंच नाही तर भर रस्त्यात तिचं तोंड फोडण्याची धमकी चित्रा वाघ यांनी दिली आहे. डिसेंबर 2022मध्ये त्यांनी माध्यमांशी बोलताना ही धमकी दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, उर्फी माझ्या हातात आली तर मी आधी तिचं तोंड फोडेन नंतर मी काय केलं हे ट्विट करून सांगेन’.

News18लोकमत
News18लोकमत

उर्फीच्या वकिलांनी पुढे म्हटलं आहे की, ‘चित्रा वाघ यांनी असंही म्हटलं उर्फी समोर आली तर तिला आधी साडी चोळी देईन. उर्फीला कपड्यांची अॅलर्जी असेल तर तिला सर्व प्रकारची औषधं देईन. अशा आक्रमक भूमिकेमुळे उर्फीवर कधीही हिंसक हल्ला होऊ शकतो. त्यामुळे महिला आयोगानं चित्रा वाघ यांच्यावर पोलीस कारवाई करावी’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात