जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Urfi Javed प्रकरणात चित्रा वाघांनी का घेतलं मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचं नाव?

Urfi Javed प्रकरणात चित्रा वाघांनी का घेतलं मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतचं नाव?

तेजस्विनी पंडीत, उर्फी जावेद, चित्रा वाघ

तेजस्विनी पंडीत, उर्फी जावेद, चित्रा वाघ

उर्फी जावेद प्रकरणात मध्येच तेजस्विनी पंडित कुठून आली असा प्रश्न सर्वांना पडला. नेमकं काय प्रकरण आहे? आणि उर्फी जावेद प्रकरणाशी तेजस्विनी पंडीतचा काही संबंध आहे का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 जानेवारी : अभिनेत्री उर्फी जावेद वरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सोशल मीडिया आणि मुंबईच्या रस्त्यावर विचित्र कपड्यांवर फिरणाऱ्या उर्फीला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलंच फटकारलं आहे. ‘उर्फीला बेड्या ठोका, असा नंगा नाच महराष्ट्रात खपवून घेतला जाणार नाही’, अशी भूमिका घेत चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. उर्फी जावेद प्रकरणाबाबत चित्रा वाघ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी उर्फी आणि महिला आयोगावर चांगलेच ताशेर ओढले. दरम्यान याचवेळी चित्रा वाघ यांनी मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचं नाव घेतलं. उर्फी जावेद प्रकरणात मध्येच तेजस्विनी पंडित कुठून आली असा प्रश्न सर्वांना पडला. नेमकं काय प्रकरण आहे? आणि उर्फी जावेद प्रकरणाशी तेजस्विनी पंडीतचा काही संबंध आहे का? पाहूयात. उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक महिला नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.  महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उर्फी जावेद प्रकणारवर  प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, कोणी काय कपडे परिधान करावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठरावीक व्यक्तींना अश्लील वाटत असेल पण इतरांना तो अश्लील वाटत नसेल. त्यामुळे आयोग अशा प्रकरणात आपला वेळ वाया घालवू शकत नाही. हेही वाचा - Urfi Javed : दीपिकानंतर उर्फीवरही चढला बेशरम रंग; भगव्या कपड्यातील ‘तो’ Video चर्चेत रुपाली चाकणकर यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर सणकून टीका केली. पत्रकार परिषद घेत महिला आयोगानं आधी केलेल्या कारवायांचा पाढा वाचून दाखवला. यात त्यांनी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि निर्माता दिग्दर्शक संजय जाधव याचंही नाव घेतलं.  चित्रा वाघ म्हणाल्या, ‘उर्फीला नाही तर तिच्या नंगानाचाला विरोध आहे. सार्वजनिक ठिकाण असा नंगाना आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.  उर्फी जावेद विरोधात कारवाई करण्यासाठी महिला आयोग त्यांचा वेळ वाया घालवणार नाही. का महिला आयोगानं हात टेकले का?’, असा सवाल त्यांनी केला. चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, ,दुटप्पी भूमिका घेणारं महिला आयोग महिलांचा काय सन्मान राखणार आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची ‘अनुराधा’ नावाची वेब सीरिज आली होती. त्या वेब सीरिजचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर महिला आयोगानं धुम्रपान समर्थन, अंग प्रदर्शन करता म्हणून अभिनेत्री आणि निर्मात्याविरोधात नोटीस काढली होती. सुमोटोमध्ये ट्विटरवर आलेल्या बातमीची दखल घेत अनुराधा वेब सीरिजला आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडीत संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती’.

News18लोकमत
News18लोकमत

‘पोस्टवरील बाईमुळे अंगप्रदर्शन होतंय सांगून नोटीस पाठवली गेली. ज्या ठिकाणी चुकीचं होतंय त्या ठिकाणी बोललंच पाहिजे. पण इथे पोस्टर नाही लाईव्ह शो सुरू आहे आणि तो मुंबईच्या रस्त्यावर . पोस्टवर दखल घेत नोटीस पाठवू शकतं तर मुंबईच्या रस्त्यावर सुरू असलेला नंगा नाच यावर कारवाई करू शकत नाही का?’, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात