ठाकरे पर्व! उद्धव ठाकरेंसोबत 'हे' नेते घेणार मंत्रिपदाची शपथ

ठाकरे पर्व! उद्धव ठाकरेंसोबत 'हे' नेते घेणार मंत्रिपदाची शपथ

शिवाजी पार्कवर शपथविधीची जोरदार तयारी. शिवराज्यभिषेकावर आधारीत असणार शपथविधी सोहळ्याची थीम.

  • Share this:

अभिषेक पांडे (प्रतिनिधी) मुंबई, 28 नोव्हेंबर: दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. शिवतीर्थावर महाविकासआघाडीचे उमेदवार उद्धव ठाकरे आज संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते शपथ घेणार आहे. शिवाजी पार्क इथे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधीसाठी शिवराज्यभिषेक ही थीम आहे. तर भला मोठा स्टेज उभारण्यात आलाय. शिवाजी पार्कमध्ये 30 हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलीय. दादार परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर घरवापसी केली आहे. त्यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंसोबत अजित पवारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपद अशी दोन्ही महत्त्वाची खाती हवी आहेत. मात्र त्याबाबत महाविकास आघाडीत अद्यापही एकमत झालेलं नाही. मात्र काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

वाचा-'ठाकरे' आडनाव हे एका ब्रिटिश कादंबरीकाराचे, वाचा काय आहे इतिहास

उद्धव ठाकरेंसोबत हे नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता

एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, सुनील प्रभू, अनिल परब, दीपक केसरकर, गुलाबराव पाटिल, संजय राठोड, आशीष जायसवाल, गोपीकिशन बाजोरिया, तानाजी सावंत, उदय सामंत शिवसेनेचे हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटिल, छगन भुजबळ, दिलीप वलसे पाटिल, हसन मुश्रिफ़, राजेश टोपे, नवाब मलिक, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, जितेंद्र अव्हाड मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख, बालासाहेब थोरात, के सी पड़वी, सुनील केदार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, नाना पटोले, वर्षा गायकवाड़ ह्या मंत्र्यांची नाव चर्चेत आहेत.

या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंनी केंद्रातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण दिल्याची माहिती आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग, अमित शाह यांच्यासह केंद्रातील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून निमंत्रण दिलं आहे. तसंच निमंत्रण पत्रिकाही फॅक्सद्वारे पाठवण्यात आली आहे.

वाचा-अजित पवार स्वत:चाच एक डायलॉग विसरले आणि शरद पवारांशी घेतला पंगा!

बुधवारी दुपारी मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह घटक पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल 3 तासांहून जास्त चर्चा झाली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाचे बदल जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे 2 मंत्री शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहीती  प्रफुल्ल पटेल यांनी दिलीय. तर काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद असणार आहे. 3 डिसेंबरला उर्वरित मंत्र्यांना शपथ देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्रिपद सेना, उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेणार आहे. तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते शपथ घेणार आहे.

शिवसेनेकडे मुख्यमंत्री आणि 11 मंत्रिपदं असणार आहे. तसंच 4 राज्यमंत्रिपदही असणार आहे.  नगरविकास, सामान्य प्रशासन आणि उत्पादन शुल्क आणि जीएसटी ही खाती असणार आहे.

त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद आणि 12 महत्त्वाची खाती  असणार आहे. तसंच 4 कॅबिनेटपदही मिळणार आहे. यामध्ये गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम सारखी मुख्य खाती ही राष्ट्रवादीकडे असणार आहे. यात महामंडळाचाही समावेश असणार आहे.

तर काँग्रेसकडे विधानसभेचं अध्यक्षपद आणि 10 महत्त्वाची खाती असणार आहे. तसंच 2 राज्यमंत्रिपदही असणार आहे.  यामध्ये कृषी, महसूल, गृहनिर्माण आणि जलसंपदा ही महत्त्वाची खाते असणार आहे. यात महामंडळाचाही समावेश असणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 28, 2019, 7:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading