मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'ठाकरे' आडनाव हे एका ब्रिटिश कादंबरीकाराचे, वाचा काय आहे इतिहास

'ठाकरे' आडनाव हे एका ब्रिटिश कादंबरीकाराचे, वाचा काय आहे इतिहास

ठाकरे कुटुंबीय त्यांच्या नावाचे स्पेलिंग Thackeray असं लिहिण्यामागेही एक इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी आडनावात Thackeray हा शब्द जोडला होता.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 27 नोव्हेंबर : शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि युवासेना प्रमुख यांच्या रुपाने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्याने निवडणूक लढवली. आदित्य यांनी वरळी मतदार संघातून निवडणूक लढवली. यात त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला.

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या सोशल मीडियावर नजर टाकली असता त्यांच्या ठाकरे आडनावाचं स्पेलिंग थोडं वेगळंच दिसतं. आपण मराठीत ठाकरे असं जरी लिहित असलो तरी स्पेलिंगनुसार त्याचा उल्लेख थॅकरे असा होतो. ठाकरे कुटुंबीय त्यांच्या नावाचे स्पेलिंग Thackeray असं लिहिण्यामागेही एक इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी आडनावात Thackeray हा शब्द जोडला होता.

केशव सिताराम ठाकरे यांचे आधीचे आडनाव पनवेलकर असं होतं. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल इथं झाला होता. प्रबोधनकारांच्या आत्मकथेत म्हटलं आहे की, त्यांचे पुर्वज धोडप किल्ल्याचे किल्लेदार होते. तेव्हा त्यांचे आडनाव धोडपकर होते. केशव सिताराम ठाकरेंचे पणजोबा कृष्ण माधव धोडपकर हे रायगड जिल्ह्यातील पाली इथं राहत होते. प्रबोधनकारांचे आजोबा रामचंद्र धोडपकर हे पनवेलमध्ये राहिले तेव्हापासून पनवेलकर हे आडनाव त्यांनी लावले. प्रबोधनकारसुद्धा सुरुवातीला पनवेलकर असं आडनाव लावत होते पण नंतर त्यांनी स्वत: ठाकरे असं आडनाव केलं.

प्रबोधनकार ठाकरे हे भारतात जन्मलेल्या विल्यम मेकपीस थॅकरे (William Makepeace Thackeray) यांचे चाहते होते. त्यांचीच प्रेरणा घेऊन नावापुढे Thackeray हा शब्द जोडला. विल्यम थॅकरे प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार होते. त्यांचा जन्म कोलकत्त्यात 1781 मध्ये झाला होता. त्यांचे वडील इस्ट इंडिया कंपनीत सचिव होते. थॅकरे यांच्या कथा-कादंबरी यावर अनेक मालिका आणि चित्रपटही आले होते.

केशव सिताराम ठाकरे यांनी प्रबोधनकार या नावाने लेखन सुरु केलं. त्यानंतर ते प्रबोधनकार ठाकरे या नावाने ओळखले जाऊ लागले. भारत सरकारने त्यांच्या नावाने 2002 मध्ये पोस्टाचं तिकिटही काढलं.

First published:

Tags: Uddhav thackeray