जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दिवाळीनंतर उद्धव ठाकरे पुन्हा ऍक्शन मोडमध्ये, 15 दिवस करणार 2 वर्षांचं प्लानिंग!

दिवाळीनंतर उद्धव ठाकरे पुन्हा ऍक्शन मोडमध्ये, 15 दिवस करणार 2 वर्षांचं प्लानिंग!

दिवाळीनंतर उद्धव ठाकरे पुन्हा ऍक्शन मोडमध्ये, 15 दिवस करणार 2 वर्षांचं प्लानिंग!

उद्धव ठाकरे हे दिवाळीनंतर पुन्हा ऍक्शन मोडमध्ये येणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 ऑक्टोबर : उद्धव ठाकरे हे दिवाळीनंतर पुन्हा ऍक्शन मोडमध्ये येणार आहेत. 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर अशा 15 दिवस उद्धव ठाकरे राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. मातोश्रीवर या बैठका होणार आहेत. राज्यातील 2019 ला शिवसेनेनं लढवलेल्या लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. या बैठकांवरुन शिवसेनेनं 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना फुटून दोन पक्ष झाल्यावर सध्या शिवसेना ठाकरे गटाकडे 6 खासदार आहेत कर शिंदे गटाकडे 12 खासदार आहेत. शिंदे गटातील 12 खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्रीवर होणार आहेत. सुभाष देसाईंच्या टक्केवारीमुळे टाटा एअरबेस महाराष्ट्रातून गेला, भाजप नेत्याचा ठाकरे गटावर रोष ठाकरेंची अस्तित्वाची लढाई जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर शिवसेनेमध्ये बंड झालं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांसोबत वेगळी भूमिका घेतली, त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. आमदारांपाठोपाठ शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांनी यानंतर शिवसेनेवरही दावा ठोकला, त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे त्यांचं चिन्हही गोठवलं. निवडणूक आयोगाने शिंदेंना बाळासाहेबांची शिवसेना तर ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं. तसंच शिंदेंना ढाल तलवार आणि ठाकरेंना मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. ’..त्यापेक्षा तर आमचंच केंद्रासोबत चांगलं चाललं होतं’, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला टोला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात