पुणे 28 ऑक्टोबर : वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं एकच इंजिन आहे, तरी फेल का होतंय? असा सवाल आदित्य ठाकरेंना केला आहे. यासोबतच त्यापेक्षा तर आमचंच चांगलं चाललं होतं केंद्रासोबत, असा टोलाही त्यांनी लगावला. Chandrakant Patil : टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाय? चंद्रकांत पाटलांचा पत्रकारांनाच उलट सवाल आदित्य ठाकरे म्हणाले, की आमच्या काळात कोविडच्या काळात आम्ही साडेसहा हजार कोटी आणले. यासोबतच दोन चायनीज कंपनी सोबतचं काम थांबवलं. या खोके सरकारनं एकही उद्योग राज्यात ठेवला नाही. आपले मुख्यमंत्री मंडळ दहीहंडी, राजकीय भेटी, फोडाफोडी हे सोडून काहीच करत नाही, असा आरोपही त्यांनी एकनाथ शिंदेंवर केला आहे. दुसऱ्या राज्यात जाऊन मुख्यमंत्री यांनी काही आणलेलं नाही. कृषिमंत्री कोण आहेत हे शेतकऱ्यांना माहीत नाही. उद्योजकांना उद्योगमंत्री माहीत नाहीत. या राज्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. ‘न्याय मागून मिळणार नसेल तर कानफाडात खेचून..’; खासदार ओमराजेंचा सरकारला अल्टीमेटम आदित्य ठाकरे आज पुणे मनपा आयुक्तांना भेटले. या भेटीबाबतही त्यांनी माहिती दिली. आदित्य ठाकरे म्हणाले, की मविआ काळातील काही प्रोजेक्टचा आढावा घेतला . पुणे पालिकेतून ev बससोबतच ev बाईक, short बस सुरु करणे बाबत चर्चा केली. गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला. यात पाणी तुंबण्याचे विषय गंभीर आहेत. पुण्याचा river front विकास झाला पाहिजे, पर्यावरणवादींना सोबत घेऊन काम व्हावं, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. पर्यावरण आणि शहरीकरण यावर माझी कायम चर्चा होत असते, पण शहरीकरणामुळे मी चिंतेत आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.