मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Prasad Lad BJP : सुभाष देसाईंच्या टक्केवारीमुळे टाटा एअरबेस महाराष्ट्रातून गेला, भाजप नेत्याचा ठाकरे गटावर रोष

Prasad Lad BJP : सुभाष देसाईंच्या टक्केवारीमुळे टाटा एअरबेस महाराष्ट्रातून गेला, भाजप नेत्याचा ठाकरे गटावर रोष

टाटा एअरबस महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विराधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. विरोधकांनी टाट एअरबस हा प्रकल्प राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेल्याचा आरोप केला.

टाटा एअरबस महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विराधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. विरोधकांनी टाट एअरबस हा प्रकल्प राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेल्याचा आरोप केला.

टाटा एअरबस महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विराधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. विरोधकांनी टाट एअरबस हा प्रकल्प राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेल्याचा आरोप केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 ऑक्टोबर : टाटा एअरबस महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विराधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. विरोधकांनी टाट एअरबस हा प्रकल्प राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेल्याचा आरोप केला. यावरून सरकारकडून या आरोपांचे खंडण करण्यात येत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत टीका केली. लोकांची दिशाभूल करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केलं जात आहे. वर्षभरापूर्वी टाटाचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.

लाड महाविकास आघाडीवर टीका करताना शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, लोकांची दिशाभूल करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केलं जात आहे. वर्षभरापूर्वी टाटाचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला होता. सुभाष देसाई येणाऱ्या प्रत्येक उद्योजकांकडे किती टक्के मागत होते हे त्यांनी आधी सांगावं. भूषण देसाई टक्केवारीसाठी दुबईमध्ये कशा बैठका घेत होते हे त्यांनी आधी सांगावं. मातोश्रीला किती टक्के पोहोचायचं हे देसाई यांच्याकडून सांगितलं पाहिजे असा आरोप लाड यांनी केला.

हे ही वाचा : '..त्यापेक्षा तर आमचंच केंद्रासोबत चांगलं चाललं होतं', आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला टोला

ते पुढे म्हणाले, किती पैसे घेतले कशा पद्धतीने फाईल फिरल्या याची सर्व जंत्री आमच्याकडे आहे. आम्ही ते योग्य वेळी बाहेर काढू आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. आमच्याकडे आतापर्यंत अनेक गोष्टीचे पुरावे होते नवाब मलिक प्रकरणातील अनिल देशमुख यांचा प्रकरण असेल तर आम्ही ते तडीस नेलं हे देखील योग्य वेळी नेणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यावर माजी मंत्री जयंत पाटील यांनी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हा सवाल उपस्थित करत. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांवर टीका केली होती. यावर लाड म्हणाले, जयंत पाटील आम्हाला विचारतात म्हणजे त्यांचा प्रश्न हा महाराष्ट्रातील हास्य जत्रेचा कार्यक्रम वाटेल असाच आहे.

हे ही वाचा : टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाय? चंद्रकांत पाटलांचा पत्रकारांनाच उलट सवाल

आदित्य ठाकरेंची टीका

वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं एकच इंजिन आहे, तरी फेल का होतंय? असा सवाल आदित्य ठाकरेंना केला आहे. यासोबतच त्यापेक्षा तर आमचंच चांगलं चाललं होतं केंद्रासोबत, असा टोलाही त्यांनी लगावला.

First published:
top videos

    Tags: Shiv Sena (Political Party), Subhash desai, Uddhav Thackeray (Politician)