कोल्हापुरच्या महालक्ष्मीबाबत 'तो' मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा

कोल्हापुरच्या महालक्ष्मीबाबत 'तो' मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरवणाऱ्यांवर कोल्हापूर सायबर सेलची करडी नजर आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 5 एप्रिल: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरवणाऱ्यांवर कोल्हापूर सायबर सेलची करडी नजर आहे. सोशल मीडियात जातीय तेढ निर्माण करण्यासह अफवा पसरवणारे मेसेज व्हायरल करणाऱ्या एकूण आठ जणांवर जिल्ह्यातील विविध 5 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

कोल्हापूरची अंबाबाई अर्थात महालक्ष्मीचं मंगळसूत्र तुटल्याचा वायरल मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या दोन महिलांविरोधात जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर देखील जातीय तेढ निर्माण करणारा मेसेज सोशल मीडिया पाठवल्याबद्दल तर तबलिगी प्रकरणावरून मुस्लिम समाजाच्या भावना भडकावणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा..धक्कादायक माहिती उघड, अवघ्या 45 मिनिटांत झाली असती कोरोनाची चाचणी; पण...

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अपवा पसरवल्या जात आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई बद्दल अशीच एक अफवा पसरली आहे.

हेही वाचा..महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान, बाधितांची संख्या 690 वर, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

22 हजार महिला विधवा होणार

'अंबाबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटलं असून त्या मंगळसूत्रातील 22 हजार मनी हरवले आहेत. त्यामुळे 22 हजार महिला विधवा होणार आहेत. मात्र त्यावर एक उपाय आहे. तो म्हणजे महिलांनी एक दोरा घेऊन तो पिवळा करून त्याच्यावर हळकुंड बांधून तो नवऱ्याकडून गळ्यात बांधवा, असा उपाय पुजाऱ्यांनी सांगितला आहे.' अशा अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच समाजकंटकांकडून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहे. याबाबत अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांनी जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही अफवा असून यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे.

हेही वाचा..मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात 'कोरोना'चा धोका आणखी वाढला

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं की, शुक्रवारपासून सोशल मीडियातून ही अंबाबाईबद्दल अफवा पसरवली जात आहे. याबाबत सातत्याने कोल्हापूर व अन्य ठिकाणच्या भाविकांकडून विचारणा होऊ लागली आहे. वस्तूस्थिती अशी की, अंबाबाईचं नित्य वापरातील सोन्याचं मंगळसूत्र व सौभाग्य अलंका सुस्थितीत आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोल्हापूरच्या मंदिरात कधीच गाऱ्हाणं घातलं जात नाही. तरीही या संदेशात पुजाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या संदेशामुळे आधीच कोरोनामुळे भयग्रस्त नागरिकांमध्ये आणखी भीती पसरली आहे.

दरम्यान, हा संदेश ज्या कुणी तयार करुन सोशल मीडियात पसरवला आहे. त्यांनी हेतू पुरस्तर समाजात भीती पसरवली, श्रीपुजकांबद्दल गैरसमज पसरवणे, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात केली होती. या मागणीची पोलिसांनी आता दखल घेतली आहे.

First published: April 5, 2020, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading