मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING: महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान, बाधितांची संख्या 690 वर, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

BREAKING: महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान, बाधितांची संख्या 690 वर, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

या ठिकाणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. खरंच या रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि बाकी इतर गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही याची पाहाणी केली.

या ठिकाणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला. खरंच या रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि बाकी इतर गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही याची पाहाणी केली.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित संख्या 690 झाली आहे. कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत.

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 5 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित संख्या 690 झाली आहे. कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत रविवारी 29 नवे रुग्ण आढळले. पुणे 17, पिंपरी चिंचवड 04, अहमदनगर 03,औरंगाबाद 02 अशी 55 रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत 56 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी सांगितलं की,  राज्यातील इतर शहराच्या तुलनेन मुंबईत जास्त संख्या वाढताना दिसते. काळजीची गोष्ट आहे लोकांनी बाहेर पडू नका खबरदारी घ्या. एकदम लाॅकडाऊन संपणार नाही, जिथ काहीच नाही तिथ प्रथम हटवला, जाईल पण जिथ संख्या जास्त तिथ वेगळा विचार करून निर्णय घेतला जाईल. दिवे लावणे यात विज्ञान नाही पण देशांचा ऐक्य विषय असावा, लोकांनी गर्दी न करू नये इतकेच अपेक्षित आहे.

हेही वाचा...कोरोनाशी लढण्यासाठी मोदींकडे ट्रम्प यांनी मागितलेलं औषध कोणतं?

दरम्यान,  देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 3 हजाराच्यावर गेली आहे. त्यातही सर्वात जास्त रुग्ण म्हणजे 690 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. मुंबई आणि पुण्याला कोरोनाचा धोका सर्वात जास्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत पुण्यातील दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक 60 वर्षींची ज्येष्ठ महिला आहे तर दुसरा 48 वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. या दोघांवरही ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट रात्री उशिरा आला होता. या रिपोर्टमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट लिहिलं होतं.

हेही वाचा.. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेणार, मनमोहनसिंग आणि सोनियांना केला फोन

या कोरोनाग्रस्त 60 वर्षीय महिलेला काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यानं उपचारासाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. या महिलेला पुन्हा काल अस्वस्थ वाटू लागल्यानं नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा रिपोर्ट उशिरा आला त्यावेळी तिला करोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

जिल्हानिहाय आकडेवारी

मुंबई – 377

पुणे (शहर व ग्रामीण भाग)– 103

मुंबई वगळून मंडळातीत इतर मनपा व जिल्हे 77

सांगली – 25

अहमदनगर – 20

नागपूर – 17

लातूर - 8

बुलढाणा- 5

औरंगाबाद – 5

यवतमाळ – 4

सातारा – 3

उस्मानाबाद -3

कोल्हापूर – 2

रत्नागिरी – 2

जळगाव- 2

वाशिम-1

सिंधुदुर्ग – 1

गोंदिया – 1

नाशिक – 1

अमरावती -1

हिंगोली -1

First published:

Tags: Corona