मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Gadchiroli encounter: मिलिंद तेलतुंबडे करणार होता आत्मसमर्पण पण नेमकं काय घडलं की चकमकीत झाला ठार, पाहा Exclusive Report

Gadchiroli encounter: मिलिंद तेलतुंबडे करणार होता आत्मसमर्पण पण नेमकं काय घडलं की चकमकीत झाला ठार, पाहा Exclusive Report

मिलिंद तेलतुंबडे करणार होता आत्मसमर्पण मग असं काय झालं की चकमकीत झाला ठार?

मिलिंद तेलतुंबडे करणार होता आत्मसमर्पण मग असं काय झालं की चकमकीत झाला ठार?

Exclusive report on Gadchiroli encounter: गडचिरोलीत झालेल्या चकमकीत एकूण 27 माओवादी ठार झाले. यामध्ये माओवाद्यांचा मोठा नेता असलेल्या मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे.

गडचिरोली, 20 नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्यात 13 नोव्हेंबर रोजी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक (Gadchiroli Encounter) झाली. या चकमकीत पोलिसांच्या सी 60 कमांडोच्या (C-60 Commandos) टीमने 27 माओवाद्यांना ठार केले. यामध्ये देशातील माओवाद्यांचा सर्वात मोठा नेता अशी ओळख असलेल्या मिलिंद तेलतुंबडे (Maoist leader Milind Teltumbde) याचाही समावेश होता. मिलिंद तेलतुंबडे याच्यावर कोट्यवधी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. अखेर तो चकमकीत ठार झाला. या चकमकीपूर्वी मिलिंद तेलतुंबडे आत्मसमर्पण (Milind Teltumbde wants to surrender) करणार होता. पण असं काय झालं की, त्याने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला? पाहूयात न्यूज 18 लोकमतच्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांचा स्पेशल रिपोर्ट. (Exclusive report on Gadchiroli Encounter)

आत्मसमर्पण करणार होता मिलिंद तेलतुंबडे

गडचिरोली चकमकीच्या संदर्भात डीआयजी संदीप पाटील यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितले की, माओवादी मिलिंद तेलतुंबडे हा मार्च-एप्रिल महिन्यात आत्मसमर्पण करणार होता. या संदर्भात आम्ही दिल्ली गृह मंत्रालयाला सुद्धा कळवले होते आणि त्या बाबतीत बोलणंही सुरू झालं होतं.

वाचा : चकमकीत माओवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे ठार

8 बॉडिगार्डसोबत मिलिंद तेलतुंबडे करणार होता आत्मसमर्पण

मिलिंद तेलतुंबडे याच्यासोबत एकूण 8 बॉडिगार्ड आणि इतरांसोबत आत्मसमर्पण करणार होते. या संदर्भात आमचं बोलणं सुरू होतं. मात्र, नंतर मिलिंद तेलतुंबडे याच्या बॉडिगार्ड्सने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. त्यामुळे मिलिंद तेलतुंबडे याने सुद्धा आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. जर त्यावेळी मिलिंद तेलतुंबडे याने आत्मसमर्पण केले असते तर तो आज मारला गेला नसता असंही डीआयजी संदीप पाटील यांनी सांगितलं.

... म्हणून मिलिंद तेलतुंबडे आणि सुखलाल एकत्र आले

मिलिंद तेलतुंबडे याच्यासोबत जहाल माओवादी सुखलाल हा सुद्धा चकमकीत मारला केला. हे दोघेही मिळून नक्सल वीकचं डिसेंबरमध्ये करणार होते. यासाठीच्या तयारीसाठी मिलिंद तेलतुंबडे आणि सुखलाल यांनी एकमेकांची भेट घेतली होती. तसेच इतरही माओवादी नेते या बैठकीसाठी एकत्र आले होते. 10 नोव्हेंबर रोजी मिलिंद तेलतुंबडे तेथे दाखल झाला आणि 13 तारखेला झालेल्या चकमकीत दोघेही ठार झाले अशीही माहिती डीआयजी संदीप पाटील यांनी दिली.

वाचा : गडचिरोलीत आणखी एका जहाल माओवाद्याचा मृतदेह सापडला

कोण होता मिलिंद तेलतुंबडे?

मिलिंद तेलतुंबडे गेल्या 25 वर्षांपासून तो नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. मिलिंदला पकडून देण्याऱ्यांना तीन राज्यांनी मिळून 2 कोटींच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती. मिलिंद तेलतुंबडे हा उच्च शिक्षित होता. त्याचं सातवीपर्यंतचं शिक्षण यवतमाळ जिल्ह्याच्या राजुरा गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर तो पुढील शिक्षणसाठी वणी येथे गेला. त्याला चार भाऊ आणि तीन बहिणी आहेत. मिलिंद हा तेलतुंबडे दाम्पत्याचं सहावं अपत्य होता. चकमकीत मिलिंद ठार झाला. भीमा कोरेगाव प्रकरणात मिलींद तेलतुंबडेचे बंधू आनंद तेलतुंबडेसह काही जणांना खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोपही माओवादी संघटनेनं केला आहे.

कोण होता सुखलाल?

सुखलाल हा माओवाद्याच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य होता. त्याच्यावर 25 लाखाचे बक्षीस होते. उत्तर गडचिरोलीसह गोंदीया सीमावर्ती भागातील अनेक गंभीर घटनांचा सूत्रधार होता. सुखलालवर 51 गुन्हे दाखल असून 15 जवान जांभुळखेडा स्फोटात शहीद झाले होते. त्या घटनेतही सुखलालची महत्त्वाची भूमिका होती. त्याच्यावर चकमकीचे 20 तर खुनाचे 16 गुन्हे सुखलालवर दाखल आहेत. त्याच्या मृत्यूमुळे उत्तर गडचिरोलीत माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या चकमकीमध्ये मिलिंद तेलतुंबडे, जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम या जहाल माओवाद्यांचा मृत्यू झाला आहे.

वाचा : माओवाद्यांचा खात्मा करणाऱ्या C-60 पथकाला 51 लाखांचं बक्षीस जाहीर

बदला घेण्याचा इशारा

13 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीच्या ग्यारापत्तीच्या जंगलात सी-60 कमांडोच्या पथकांनी 27 माओवाद्यांचा खात्मा केला होता. आता या 27 माओवाद्यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी येत्या 27 नोव्हेंबर रोजी माओवाद्यांनी सहा राज्यात बंदचे आवाहन केले आहे. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने याबद्दल पत्रक जारी केले आहे. तसंच, मृतक माओवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचे माओवाद्यांनी इशारा दिला आहे.

विशेष म्हणजे, मिलींद तेलतुंबडे 1992 पासून माओवादी चळवळीत सक्रिय असल्याची कबुलीच माओवाद्यांनी दिली आहे. या पत्रकातून मिलींद तेलतुंबडेसह इतर माओवादी नेत्यांचा उल्लेख करत संघटनेकडून श्रद्धांजली अर्पण करत कुटूंबियाच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

First published:
top videos

    Tags: Gadchiroli, Naxal Attack, Police