मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मिलिंद तेलतुंबडे आमचा नेता' माओवाद्यांची कबुली, दिला बदला घेण्याचा इशारा

'मिलिंद तेलतुंबडे आमचा नेता' माओवाद्यांची कबुली, दिला बदला घेण्याचा इशारा

 27 माओवाद्यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी येत्या 27 नोव्हेंबर रोजी माओवाद्यांनी सहा राज्यात  बंदचे आवाहन केले आहे.

27 माओवाद्यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी येत्या 27 नोव्हेंबर रोजी माओवाद्यांनी सहा राज्यात बंदचे आवाहन केले आहे.

27 माओवाद्यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी येत्या 27 नोव्हेंबर रोजी माओवाद्यांनी सहा राज्यात बंदचे आवाहन केले आहे.

गडचिरोली, 19 नोव्हेंबर : गडचिरोलीमध्ये (gadchiroli) पोलिसांच्या C-60 कमांडो पथकाने धडकेबाज कारवाई करत एकाच वेळी 27 माओवाद्यांचा (27 Maoist dead) खात्मा केला. पण, आता माओवाद्यांनी या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी आता डोके वर काढले आहे.  माओवाद्यांनी सहा राज्यात बंद  पुकारला आहे. तसंच, मिलिंद तेलतुंबडे ( Milind Teltumbde) आपल्या चळवळीत सक्रीय होते, अशी कबुलीही माओवाद्यांनी दिली. 13 नोव्हेंबर रोजी गडचिरोलीच्या ग्यारापत्तीच्या जंगलात सी-60 कमांडोच्या पथकांनी 27 माओवाद्यांचा खात्मा केला होता. आता या 27 माओवाद्यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी येत्या 27 नोव्हेंबर रोजी माओवाद्यांनी सहा राज्यात  बंदचे आवाहन केले आहे. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने याबद्दल पत्रक जारी केले आहे. तसंच, मृतक माओवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याचे माओवाद्यांनी इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, मिलींद तेलतुंबडे 1992 पासून माओवादी चळवळीत सक्रिय असल्याची कबुलीच माओवाद्यांनी दिली आहे. या पत्रकातून मिलींद तेलतुंबडेसह इतर माओवादी नेत्यांचा उल्लेख करत संघटनेकडून श्रद्धांजली अर्पण करत कुटूंबियाच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 2024 मध्ये चार्जर नसलेले स्मार्टफोन येणार बाजारात? पाहा काय आहे योजना... गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात पोलिसांची सात पथकं शोध अभियान राबवत होते. यावेळी काही माओवाद्यांनी अचानक सी 60 पोलीस पथकावर गोळीबार केला. या चकमकीला पोलिसांनी योग्य ते प्रत्युत्तर देत 27 माओवाद्यांना ठार केलं. मिलींद तेलतुंबडे याचाही समावेश होता. ट्रान्सजेंडर मॉडेलने हिजाब घातला म्हणून मोठा वाद; शेवटी कायमचा सोडला देश गेल्या 25 वर्षांपासून तो नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. मिलिंदला पकडून देण्याऱ्यांना तीन राज्यांनी मिळून 2 कोटींच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती.  मिलिंद तेलतुंबडे हा उच्च शिक्षित होता. त्याचं सातवीपर्यंतचं शिक्षण यवतमाळ जिल्ह्याच्या राजुरा गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर तो पुढील शिक्षणसाठी वणी येथे गेला. त्याला चार भाऊ आणि तीन बहिणी आहेत. मिलिंद हा तेलतुंबडे दाम्पत्याचं सहावं अपत्य होता. चकमकीत मिलिंदचा मृत्यू झाला. भीमा कोरेगाव प्रकरणात मिलींद तेलतुंबडेचे बंधू आनंद तेलतुंबडेसह काही जणांना खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोपही माओवादी संघटनेनं केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: गडचिरोली, माओवादी

पुढील बातम्या