मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Gadchiroli : मोठी बातमी, चकमकीत माओवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे ठार

Gadchiroli : मोठी बातमी, चकमकीत माओवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे ठार

मिलिंद तेलतुंबडे,  जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम यांचा या कारवाईमध्ये मृत्यू झाला आहे.  हे चौघेही नक्षल चळवळीचे आधारस्तंभ होते

मिलिंद तेलतुंबडे, जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम यांचा या कारवाईमध्ये मृत्यू झाला आहे. हे चौघेही नक्षल चळवळीचे आधारस्तंभ होते

मिलिंद तेलतुंबडे, जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम यांचा या कारवाईमध्ये मृत्यू झाला आहे. हे चौघेही नक्षल चळवळीचे आधारस्तंभ होते

गडचिरोली, 13 नोव्हेंबर : गडचिरोलीमध्ये (gadchiroli) झालेल्या चकमकीमध्ये 26 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. माओवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पण, या कारवाईमध्ये मिलिंद तेलतुंबडेसह ( Milind Teltumbde) आणखी तीन मोठ्या माओवादी नेत्यांचा खात्मा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद तेलतुंबडे,  जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम यांचा या कारवाईमध्ये मृत्यू झाला आहे.  हे चौघेही नक्षल चळवळीचे आधारस्तंभ होते.  मात्र पोलिस अधीक्षक यांनी अजून याला अधिकृत दुजोरा दिला नाही. उद्या दुपारी मृतदेह आल्यानंतर व ओळख परेड झाल्यानंतरच याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल, असे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

VIDEO: आलिया-रणबीर राजस्थानमध्ये करणार साखरपुडा? हे खरं की अफवा!

दरम्यान, गडचिरोलीत आज सकाळी ग्यारापत्तीच्या जंगलात पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक सुरू झाली होती. धानोरा तालुक्यात मुरुम गावाजवळील जंगलामध्ये माओवादी मोठ्या प्रमाणात लपून बसले होते. पोलीस गस्तीवर आले असल्याचा याची माहिती मिळाली. हे सर्व माओवादी छत्तीसगडमधून आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर माओवादी विरोधी पथकाने या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले. याच दरम्यान जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली.

या चकमकीत पोलीस जवानांनी माओवाद्यांचा हल्ला परतवून लावला. दिवसभर झालेल्या धुमश्चक्रीमध्ये जवानांनी मोठ्या हिंमतीने लढा देत  26 माओवाद्यांना ठार झाले आहे. सकाळपासून झालेल्या कारवाईत मृतक माओवाद्यांची संख्या 26 झाल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

लग्नाच्या सीजनमध्ये सोन्याच्या किमतींनी लावली आग; 9 महिन्यात सर्वात महाग सोनं

ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरदिनटोला जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू होती. सकाळी पाच मृतदेह सापडले होते. अजुनही चकमक सुरू आहे. घनदाट जंगल असल्याने सॅटेलाईट फोनवरुन पोलीस मुख्यालय संपर्क करत आहे. मृतक माओवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कसनासुर बोरीयाच्या चकमकीत 2018 मध्ये 38 माओवादी ठार झाले होते. त्यानंतरची मोठी कारवाई आहे. गेल्या वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

First published:

Tags: Naxal Attack