मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गडचिरोलीत आणखी एका जहाल माओवाद्याचा मृतदेह सापडला, 51 गुन्हे होते दाखल

गडचिरोलीत आणखी एका जहाल माओवाद्याचा मृतदेह सापडला, 51 गुन्हे होते दाखल

सुखलाल हा माओवाद्याच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य होता. त्याच्यावर 25 लाखाचे बक्षीस होते.

सुखलाल हा माओवाद्याच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य होता. त्याच्यावर 25 लाखाचे बक्षीस होते.

सुखलाल हा माओवाद्याच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य होता. त्याच्यावर 25 लाखाचे बक्षीस होते.

गडचिरोली, 16 नोव्हेंबर :  गडचिरोलीमध्ये (gadchiroli) तीन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत आणखी एक मृतदेह सापडला आहे. त्यामुळे मृतक माओवाद्यांची संख्या  27 वर पोहोचली आहे. हा मृतदेह जहाल माओवादी सुखलालचा मृतदेह असल्याचं समोर आलं आहे. त्याच्यावर तब्बल 51 गुन्हे दाखल असून 25 लाखांचे बक्षीस होते. गडचिरोलीतील चकमकीमध्ये C-60 कमांडो पथकाच्या कारवाईला आज आणखी एक यश मिळाले. ज्या दिवशी चकमक झाली होती त्यामुळे आज आणखी एका माओवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख पटवली असता तो सुखलाल असल्याचं समोर आलं. सुखलाल हा माओवाद्याच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य होता. त्याच्यावर 25 लाखाचे बक्षीस आहे. उत्तर गडचिरोलीसह गोंदीया सीमावर्ती भागातील अनेक गंभीर घटनांचा सुत्रधार आहे. देशाला मिळणार पहिला समलिंगी न्यायाधीश? नियुक्तीला 4 वेळा झाला होता विरोध सुखलालवर 51 गुन्हे दाखल असून 15 जवान जांभुळखेडा स्फोटात शहीद झाले होते. त्या घटनेतही  सुखलालची महत्त्वाची भूमिका होती. त्याच्यावर चकमकीचे 20 तर खुनाचे 16 गुन्हे सुखलालवर दाखल आहेत. त्याच्या मृत्यूमुळे उत्तर गडचिरोलीत माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या चकमकीमध्ये मिलिंद तेलतुंबडे, जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम या जहाल माओवाद्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण नक्षल चळवळीचे आधारस्तंभ होते. बाजी प्रभूंना गमवल्यानंतर राजांना काय वाटले..', भूषणची अजिंक्यसाठी पोस्ट दरम्यान, गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी 60 पथकाने अतुलनीय शौर्य दाखवून 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत 4 पोलीस जवान देखील जखमी झाले होते. पालकमंत्री शिंदे यांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात जाऊन या जवानांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे जाऊन सी 60 पथकातील पोलिसांची देखील भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विशेष प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. - गडचिरोली जिल्ह्यातील कोलगुट-ग्यारापल्ली  जंगलात 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या गडचिरोली पोलिसांच्या सी 60 कमांडो पथकाच्या टीमला जिल्हा नियोजन फंडातून 51 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी संजय मीणा यांना तसे निर्देश दिलेले आहेत.
First published:

पुढील बातम्या