मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संजय राऊतांवरील कारवाईवर शरद पवार काहीच का बोलले नाही? सुप्रिया सुळेंचं भलतंच उत्तर

संजय राऊतांवरील कारवाईवर शरद पवार काहीच का बोलले नाही? सुप्रिया सुळेंचं भलतंच उत्तर

राऊतांवरील ईडी कारवाईबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, सातत्याने ईडीच्या कारवाया विरोधकांवरच होताना आपल्याला पाहायला मिळतात. पण लढत राहू कारण सत्याचा विजय होतो

राऊतांवरील ईडी कारवाईबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, सातत्याने ईडीच्या कारवाया विरोधकांवरच होताना आपल्याला पाहायला मिळतात. पण लढत राहू कारण सत्याचा विजय होतो

राऊतांवरील ईडी कारवाईबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, सातत्याने ईडीच्या कारवाया विरोधकांवरच होताना आपल्याला पाहायला मिळतात. पण लढत राहू कारण सत्याचा विजय होतो

मुंबई 02 ऑगस्ट : सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांवरील कारवाई आणि मंत्रिमंडळ विस्तारासह अनेक मुद्द्यांवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. 2000 च्या खोट्या नोटांचं प्रमाण सध्या प्रचंड वाढलेलं आहे, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की हे बॅड प्लानिंग असलेलं सरकार आहे. वास्तवतेपासून दूर गेलेल्या सरकारने भारताच्या इकॉनोमीमध्ये प्रचंड गोंधळ करून ठेवला आहे.

पनवेलमध्ये मनसेला मोठे खिंडार, माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांचा शिंदे गटात प्रवेश

राऊतांवरील ईडी कारवाईबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, सातत्याने ईडीच्या कारवाया विरोधकांवरच होताना आपल्याला पाहायला मिळतात. पण लढत राहू कारण सत्याचा विजय होतो. मला न्यायालयावर विश्वास आहे. आज ना उद्या न्याय नक्की मिळेल. यावेळी शरद पवार संजय राऊतांवर झालेल्या कारवाईवर काहीच का बोलले नाहीत, असा सवालही त्यांना करण्यात आला. मात्र, यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशात काही झालं तरी पवारांच्या आजुबाजूला या गोष्टी फिरतात, मला याचा आनंद आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षातील लोकांवर कारवाया झाल्या आहेत. मग कारवाया फक्त भाजपमधील नेत्यांवरच का झाल्या नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुढे त्या म्हणाल्या की अशा अनेक गोष्टी आहेत, पण मी कशाला काय बोलू?

संबित पात्रांनी केली संजय राऊतांची पोलखोल, आकडे देऊन केला मोठा खुलासा

महाविकास आघाडीची बाजू कोण मांडणार? असा सवाल विचारला असता त्या म्हणाल्या की मी आहे. मी रोज बोलते. जीएसटीबद्दल त्यांनी आपलं मत मांडलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, की हा खूप गंभीर विषय आहे आणि आम्ही सातत्याने यावर बोलत आहोत. अजित दादांनी स्वतः पत्र लिहिलं होतं, की अन्नधान्यावर जीएसटी लावू नका. हे सरकार सर्वसामान्यांवर अन्याय करत आहे, असंही त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, नड्डा यांनी घटनेला विरोध केला आहे. त्यांना आपल्या संविधानावर विश्वास नाही. तर हुकूमशाहीच्या मार्गाने हा देश चालवायचा आहे, अशा शक्यता आता नाकारता येणार नाही.

First published:
top videos

    Tags: Sanjay raut, Supriya sule