प्रमोद पाटील, प्रतिनिधी पनवेल, 02 ऑगस्ट : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. एकीकडे शिवसेनेचे आमदार, खासदार शिंदे गटात दाखल झाले आहे, तर आता मनसेच्या नेते सुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहे. पनवेल, उरण,खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे सरकारला महिना पूर्ण झाला आहे. पण अजूनही शिंदे गटामध्ये शिवसेचे आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी प्रवेशाचा धडाका लावला आहे. पनवेल, उरण,खारघरमध्ये मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. अतुल भगत हे मागील ८ वर्षांपासून जिल्हा अध्यक्ष पदावर विराजमान होते. सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अतुल भगत यांच्यासह आजी माजी पदाधिकारी यांच्यासह एकूण 65 जणांनी घेतला शिंदे गटात प्रवेश केला आहे. ( पाऊस पडताच पूल जातो पाण्याखाली; 15 वर्षांपासून समस्या ‘जैसे थे’ ) मनसे मधली अंतर्गत धुसफूस असल्याचे कारण देत अतुल भगत यांनी शिंदे गटात सामील होत असल्याचे सांगितलं आहे. उप तालुका अध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अलीकडे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईसह रायगडचा दौरा केला होता. अमित ठाकरे दौरा करून जात नाही, तेच पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ( विद्यार्थ्यांना दिली उत्तरासह प्रश्नपत्रिका, सोलापूर विद्यापीठाचा अजब कारभार ) विशेष म्हणजे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. बहुमत चाचणीमध्ये मनसेनं शिंदे-भाजप सरकारच्या बाजूने मतदान केलं होतं. मनसेने शिंदे गटाला जाहीर करण्यात पाठिंबा दिल्यानंतरही पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहे. आता या प्रवेशावरून शिंदे गट आणि मनसेमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







