मराठी बातम्या /बातम्या /देश /

संबित पात्रांनी केली संजय राऊतांची पोलखोल, आकडे देऊन केला मोठा खुलासा

संबित पात्रांनी केली संजय राऊतांची पोलखोल, आकडे देऊन केला मोठा खुलासा

 संजय राऊत यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या पत्नीला प्रवीण राऊत यांच्या

संजय राऊत यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या पत्नीला प्रवीण राऊत यांच्या

संजय राऊत यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या पत्नीला प्रवीण राऊत यांच्या

  • Published by:  sachin Salve

नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत यांचा सहभाग आहे, पण तरीही विरोधक भ्रष्टाचाराचं राजकारण करत आहे, हे संपूर्ण देश पाहत आहे, संजय राऊत हे एका पक्षाचे नेते आहेत म्हणून  ईडीने तपास न करता प्रकरण बंद करण्याची गरज आहे का? असं म्हणत  भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीने अटक केली असून 3 दिवसांची कोठडी सुनावली आहे.  संजय राऊत यांच्या अटकेवरून संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे.

विरोधक भ्रष्टाचारावर प्रकरणावर विनाकारण गोंधळ घालत आहे. या वादातून त्यांनी संसदेत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून संसदेचे कामकाज चालू देत नाही. संजय राऊत यांची न्यायालयाने कोठडीत रवानगी केली असून त्यांच्याविरोधात कागदपत्रे आहेत. हे राजकीय पक्षातले आहेत की कुठल्यातरी मोठ्या घराण्यातील आहेत म्हणून त्यांना वाचवायचे प्रयत्न सुरू आहे का? असा सवाल पात्रा यांनी केला.

(India@75 : देशाच्या अशा 5 नायिका ज्यांनी रात्रीतून ब्रिटीश सरकारला दिला हादरा)

राऊत यांच्याशी संबंधीत प्रकरणावर माझ्याकडे पुरावे आहे. पत्राचाळ हे जुने प्रकरण आहे. या जागेवर 47 एकर जमीन आहे, याठिकाणी 672 कुटुंबे भाडेकरू म्हणून राहत आहेत.  म्हाडाने 2007 मध्ये गुरु आशिष डेव्हलपर्ससोबत करार केला होता.  प्रवीण राऊत हे डिरेक्टर आहे,त्यांनी करार पाळला नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी 9 खाजगी बिल्डरांना बोलावून जमीन 901 कोटींना विकली. त्यांनी एकूण 1040 कोटी जमा केले

त्याची चौकशी व्हायला नको का? असा सवाल पात्रांनी केला.

(नागपंचमीला नागांची पूजा केल्यास मिळतील हे लाभ; काय आहे पौराणिक महत्त्व

)

संजय राऊत यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या पत्नीला प्रवीण राऊत यांच्या पत्नीने कर्ज म्हणून 83 लाख दिले होते.

त्यांनी 55 लाख परत करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत ईडी सक्रिय झाली.  2018 मध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. संजय राऊत हे एका पक्षाचे नेते आहेत म्हणून  ईडीने तपास न करता प्रकरण बंद करण्याची गरज आहे का? असा सवालही पात्रा यांनी केला.

First published: