SPECIAL REPORT : असं आहे शरद पवारांचं कुटुंब, सध्या कोण काय करतंय?

शरद पवारांचं राजकारण हे काँग्रेसमधून सुरू झालं असलं तरी त्याच्या मातोश्री शारदाबाई पवार या मात्र, शेकापमध्ये होत्या.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 09:22 PM IST

SPECIAL REPORT : असं आहे शरद पवारांचं कुटुंब, सध्या कोण काय करतंय?

मुंबई, 28 सप्टेंबर : अजित पवारांच्या नाराजीनाट्यामुळे पवार कुटुंब पुन्हा चर्चेत आलंय. पण या घराण्यात नेमके किती सदस्य आहेत आणि ते सध्या नेमके काय करतात याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

शरद पवारांचं राजकारण हे काँग्रेसमधून सुरू झालं असलं तरी त्याच्या मातोश्री शारदाबाई पवार या मात्र, शेकापमध्ये होत्या. तत्कालीन लोकल बोर्डाच्या त्या सदस्य देखील राहिल्यात. आईच्या संस्कारामुळे पवार कुटुंबीय सुरूवातीपासून सत्यशोधक आणि साम्यवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली राहिलं. अगदी शरद पवार सुद्धा देव-देव, बुवाबाबा आणि गंडेदोरे या थोतांडापासून दूर राहिलेत ते केवळ मातोश्री शारदाबाई यांच्या संस्कारामुळे.

सामाजिक कार्याचा वारसा सुद्धा आईने पवारांनाच दिला. पवार कुटुंबाच्या पहिल्या पिढीत एकटे शरद पवारच राजकारणात उतरले तर इतर भाऊ शेती आणि उद्योग व्यवसायात व्यस्त झाले.

गोविंद पवार आणि शारदबाई यांना एकूण पाच मुलं होती. त्यात थोरले आप्पासाहेब, दुसरे अनंतराव तिसरे शरद पवार, चौथे प्रतापराव आणि पाचवी मुलगी सरोजताई होत्या. आताच्या पिढीत अजित पवार हे अनंतरावाचे चिरंजीव तर सुप्रियाताई या शरद पवारांच्या कन्या आहेत.

उदयनराजेंना शह देण्यासाठी 'या' तीन नावांचा विचार, शरद पवारांच्या वक्तव्याने नवी

Loading...

तिसऱ्या पिढीतला युवराज रोहित हा आप्पासाहेबांचा नातू आहे म्हणजेच अजित पवारांचा पुतण्या आहे. तर अजित पवारांना पार्थ आणि जय ही दोन मुलं आहेत. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास हे ऑटोमोबाईल्स व्यवसायात आहेत तर प्रतापरावांचे चिरंजीव अभिजीत हे सकाळ मीडिया हाऊस चालवतात.

प्रारंभी अजित पवारांची बहीण विजया पाटील या देखील सकाळचं व्यवस्थापन पाहत होत्या पण नंतर त्या तिथून बाहेर पडल्या. तर रोहितचे वडिल राजेंद्र यांनी कृषी व्यवसायात स्वतःला गुंतवून घेतलं. त्यांचा मुलगा रोहित मात्र पूर्ण तयारीनिशी राजकारणात उतरला.

SPECIAL REPORT : पवार घराण्यात महाभारत, 'या'साठी अजितदादांनी टाकला डाव?

खरंतर पवारांच्या पहिल्या पिढीत एकटे शरद पवार राजकारणात आल्याने त्यांच्या कुटुंबात कोणताही कलह निर्माण झाला नाही. दुसऱ्या पिढीत मात्र, पुतण्या अजित पवारांसोबत शरद पवारांची मुलगी सुप्रिया देखील राजकारणात उतरली. पण तिथंही पवारांनी सुप्रिया दिल्लीत तर अजित राज्यात अशी राजकीय वाटणी करून दिली.

त्यामुळे या दोन्ही बहीण भावांमध्ये कोणतेच वाद झाले नाहीत. पण जेव्हा कुटुबांची तिसरी पिढी म्हणजेच पवारांचे नातू राजकारणात उतरले आणि तिथून पुढेच खऱ्या अर्थाने पवार घराण्यात राजकीय धुसफूस सुरू झाल्याचं बोललं जातंय.

वडील करू शकतात मुलीशी लग्न, या देशातल्या संसदेने मंजूर केलं विधेयक!

अशातच मावळमधून पार्थचा पराभव झाला याउलट रोहित मात्र, मोठ्या सफाईदारपणे राजकारणात पुढे जाताना दिसत आहे. शरद पवारही रोहितला सोबत घेऊन फिरू लागल्याने रोहित आणि पार्थची तुलना होऊ लागली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने पवार कुटुंबात कलह सुरू झाल्याचं सांगितलं जातं आहे.

=====================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 08:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...