वडील करू शकतात मुलीशी लग्न, या देशातल्या संसदेने मंजूर केलं विधेयक

वडील करू शकतात मुलीशी लग्न, या देशातल्या संसदेने मंजूर केलं विधेयक

इराणच्या संसदेत एक विचित्र स्वरूपाचं विधेयक मंजूर झालं आहे. या विधयेकानुसार वडिलांना आपल्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी मिळाली आहे.

  • Share this:

तेहरान, 28 सप्टेंबर : इराणच्या संसदेत एक विचित्र स्वरूपाचं विधेयक मंजूर झालं आहे. या विधयेकानुसार वडिलांना आपल्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी मिळाली आहे. मुलगी जर 13 वर्षांची असेल आणि तिला दत्तक घेतलेलं असेल तर अशा मुलीशी वडिलांना लग्न करता येतं.

इराणमध्ये 22 सप्टेंबरला हे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी याला विरोध केला. लंडन बेस्ड जस्टीस फॉर इराण या संघटनेचे वकील शदी सदर यांनी, हे विधेयक बालशोषणाचं समर्थनच करतं, अशी टीका केली आहे.

दत्तक घेतलेल्या मुलीशी लग्न करणं हा इराणी संस्कृतीचा भाग नाही. त्याचबरोबर हे विधेयक मुलांविरोधातल्या अत्याचारात भर घालेल. जर वडील दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीशी लग्न किंवा सेक्स करणार असतील तर हा बलात्कार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा : इम्रान खान यांच्या भाषणाला या भारतीय महिला अधिकाऱ्याने 6 मिनिटांत दिलं उत्तर)

मुलीला दत्तक घेतलं असेल तर तिला वडिलांच्या समोर बुरखा घालावा लागतो किंवा मुलाला दत्तक घेतलं असेल तर त्याच्यासमोर आईला बुरखा घालावा लागतो. त्यामुळे ही प्रथा बंद करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं, असं काही इराणी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी बहुतांश मानवाधिकार कार्यकर्त्यांनी याला जोरदार विरोध केला आहे. अशा कुटुंबांमध्ये मुलं स्वत:ला सुरक्षित समजणार नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे.

इराणमध्ये 2010 मध्ये 10 ते 14 वर्षं वयोगटातल्या 42 हजार मुलांचं लग्न झालं. इराणी न्यूज वेबसाइट 'तबनक' ने दिलेल्या माहितीनुसार तेहरानमध्येच 10 वर्षांखालच्या 75 मुलांचं लग्न झालं होतं.

============================================================================================

VIDEO : शिवसेनेच्या खासदाराने घेतली शरद पवारांची घरी जाऊन भेट

Published by: Arti Kulkarni
First published: September 28, 2019, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading