चंद्रकांत फुंदे,प्रतिनिधी मुंबई, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी ईडीला थेट अंगावर घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठं नवचैतन्य निर्माण केलं होतं. पण अजित पवारांनी नेमकं त्याचवेळी राजीनाम्याचं हत्यार उगारून आपल्या काकालाच पुरतं अडचणीत आणल्याचं बोललं जातं. शिखर बँक घोटाळ्यात आपलं नाव गोवलं गेल्यानेच उद्विग्न होऊन अजित पवारांनी राजीनामा दिला असावा, असं शरद पवार कितीही सांगत असले तरी अजित पवारांच्या नाराजीची त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडून इतरही कारणं सांगितली जात आहेत. ईडीच्या गुन्ह्यावरून अजित पवारांना खरंच राजीनामा द्यायचा असता तर त्यांनी तो गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशीच म्हणजे 24 सप्टेंबरलाच दिला असता. त्यासाठी ईडीच्या विजयोत्सवाचा मुहूर्त साधण्याची काहीच गरज नव्हती. किंबहुना एवढं टोकाचं पाऊल उचलण्याअगोदर ते नक्कीच शरद पवारांशी बोलू शकले असते. पण त्यांनी राजीनामा देण्याअगोदर शरद पवारांना साधं विश्वासातही घेतलं नाही. हे आम्ही सांगत नाहीत तर स्वतः शरद पवारच सांगत आहेत. ‘राजकारणामध्ये मर मर मरायचं आणि आरोपही सहन करायचे’, अजित पवार भावुक आमच्या कुटुंबात कोणतेही वाद नसल्याचं पवार सांगत असले तरी, त्यांना आजही कुटुंबात माझाच शब्द अंतिम मानला जातो हे पवारांनी आवर्जून का सांगितल असावं, हे कोडं मात्र, उलगडत नाही. आता आपण पवार काका पुतण्यात नेमके कशावरून वाद सुरू असावा? 1) पार्थच्या उमेदवारीला पवारांचा विरोध असूनही अजितदादांनी त्याला मावळमधून उभं केलं पण मावळमधून पार्थ पवार तब्बल दोन लाख 15 हजार मतांनी हरले या उलट सुप्रिया सुळे मात्र, बारामतीमधून तब्बल दीड लाख मतांनी जिंकल्या हा इतिहास अगदी ताजा आहे. …म्हणून अजितदादांनी राजीनामा दिला, शरद पवारांनी केला मोठा खुलासा 2) आता तिकडे विधानसभेसाठी पवार कुटंबांतील दुसरे युवराज रोहित पवार आजोबांच्या आशिर्वादाने कर्जत जामखेडमधून लढणार हे नक्की झालंय, मग पार्थचं काय होणार? या चिंतेने अजितदादा अस्वस्थ होणारच ना..समजा पार्थच्या उमेदवारीसाठी अजित पवारांनी राजीनाम्याचं हत्यार उगारलं असेल तर अजित पवारांच्या वया एवढं तब्बल 60 दशकांचं राजकारण केलेले मुरब्बी काकाही काही कमी नाहीत त्यांनीही मग चक्क पुतण्याचाच हवाला देऊन पार्थच्या उमेदवारीचा हा असा परस्परच निकाल लावून टाकला. हे झालं पार्थच्या उमेदवारीसाठीचं महाभारत…आता जरा पार्टीतल्या लिडरशीप वादाकडे पाहिलं तर या विधानसभेत खरंतर अजितदादांना मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून राष्ट्रवादीने मैदानात उतरणं अपेक्षित होतं. पण सिंचन घोटाळ्याचा फटका बसू नये. म्हणून स्वतः शरद पवारच वयाच्या 78व्या वर्षी मैदानात उतरले. तेच राज्यभर दौरे करत आहेत. बरं समजा शिवस्वराज्य यात्रेत अजितदादा होते म्हणावं तर तिथंही संभाजीफेम डॉ. अमोल कोल्हे हेच केंद्रस्थानी होते. उदयनराजेंना शह देण्यासाठी ‘या’ तीन नावांचा विचार, शरद पवारांच्या वक्तव्याने नवी बरं हे कमी काय म्हणून साहेबांनी अजितदादांचे पार्टीतले प्रतिस्पर्धी उदयनराजे यांनाच प्रोजेक्ट करण्याचा घाट घातला होता. पण त्याआधीच ते भाजपवासी बनले तो भाग अलहिदा.. थोडक्यात कायतर मग काकांच्या पार्टीत पुतण्याची ही अशी घुसमट होत होती. पण काका जिवंत असेपर्यंत बंड करणार नाही, हा पण स्वतः अजित पवारांनी केला. मग करायचं काय तर फक्त राजीनामा अस्त्र हाती उरतं. पण तो देतानाही आपलं उपद्रव मुल्य दाखवता आलं पाहिजे ना शेवटी काकांचाच पुतण्याना… कदचित म्हणूनच अजितदादांनी राजीनाम्यासाठी हे अचूक टायमिंग साधलं असावं. बरं राजीनामा दिला तर दिला आणि वरून गायबही झाले होते. थोडक्यात काय अजितदादा आपल्या सनकी स्वभावाला जागले आणि त्यातूनच हे नाराजीनामा नाट्य घडलं असावं. =================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.