सोलापूर, 25 जून : सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अखेर राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये प्रवेश करणार आहेत. 27 जून रोजी तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पंढरपुरच्या दौऱ्यावर आहेत. ते आपल्या मंत्रिमंडळासह विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. याच वेळी के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवारांच्या दौऱ्यापासून नाराज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यापासून भगीरथ भालके हे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. तेव्हापासून भगीरथ भालके हे राष्ट्रवादीवर नाराज होते. ते बीआरएसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. अखरे त्यांनी आता बीआरएसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी बीआरएस आणि एमआयएमला हलक्यात घेण्याची चूक करू नका असं अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं, अखेर याच बीआरएसने राष्ट्रवादीला पंढरपूरमध्ये मोठा दणका दिला आहे. अजित पवारांची ती भीती खरी ठरत आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भगीरथ भालके हे पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पूत्र आहेत. 2019 च्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी पराभव केला होता. Political news : सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश के. चंद्रशेखर राव हे 27 जून रोजी पंढरपूर दौऱ्यावर आहेत. ते सकाळी आपल्या मंत्र्यांसह विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते भगीरथ भालके यांच्या गावी आयोजित शेतकरी मेळाल्याला संबोधित करणार आहेत, आणि याच शेतकरी मेळाव्यात भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.