सोलापूर, 25 जून, प्रितम पंडीत : जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये दोन गट पडले. शिवसेनेतील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यसोबत गेले. त्यामुळे ठाकरे गटाकडून आता नव्यानं पक्षबांधणीचं काम हाती घेण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत. कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशाच्या वेळी जोरदार घोषणाबाजी केली.
Sangli News : जयंत पाटलांशी संबंधित राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचा छापा; संचालकांचा मोठा दावा; म्हणाले…भाजपला धक्का सोलापूर जिल्ह्यातील आगमी लोकसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने नव्यानं पक्ष बांधणी सुरू केली आहे. दक्षिण तालुक्यातील मळकोटा येथील विद्यमान भाजप ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील या पक्ष प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.