मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आता राष्ट्रीय पातळीवरही एकनाथ शिंदेंचीच 'हवा', 12 राज्यांच्या प्रमुखांचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

आता राष्ट्रीय पातळीवरही एकनाथ शिंदेंचीच 'हवा', 12 राज्यांच्या प्रमुखांचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

राज्यापाठोपाठ आता राष्ट्रीय स्तरावरही उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. 12 राज्यातील शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.  (Uddhav Thackeray camp loses chiefs from 12 states)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 16 सप्टेंबर : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील अनेक आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना राज्याच्या राजकारणात अनेक धक्के बसले. आमदारांपाठोपाठ खासदार, नगरसेवक, पदाधिकारी तसंच अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. आता उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंनंतर आता पवारांना धक्का; नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार

राज्यापाठोपाठ आता राष्ट्रीय स्तरावरही उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. 12 राज्यातील शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे गटाने 12 राज्यांचे प्रमुख गमावले आहेत. हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; बारामतीतील हा मोठा प्रकल्प जुन्नरला हलवणार

देशभरातील शिवसेना नेत्यांची मंगळवारी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला विविध राज्यांतील शिवसेनेचे अध्यक्ष, नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर देश पातळीवरही एकनाथ शिंदेंना 12 राज्यांतील प्रमुखांनी पाठींबा दिला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहार अशा अनेक राज्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

आधीच पक्ष धोक्यात आलेला असताना आता राष्ट्रीय पातळीवर बसलेल्या या धक्क्यानंतर निवडणूक चिन्हदेखील अडचणीत येणार असल्याचं बोललं जात आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav Thackeray