जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एकनाथ शिंदेंचा ठाकरेंनंतर आता पवारांना धक्का; नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंनंतर आता पवारांना धक्का; नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंनंतर आता पवारांना धक्का; नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. 2 नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहे. (Navi Mumbai NCP Corporators)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 16 सप्टेंबर : एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांनी महाविकास आघाडीतून काढता पाय घेतल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर शिवसेनेत गळती लागल्याचं पाहायला मिळालं. आमदारांपाठोपाठ खासदार, नगरसेवक, पदाधिकारी अशा अनेकांनी सेनेची साथ सोडत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकनाथ शिंदेंच्या या बंडाचा फक्त सेनेलाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; बारामतीतील हा मोठा प्रकल्प जुन्नरला हलवणार याचाच परिणाम म्हणजे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. 2 माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहे. जिल्हाध्यक्ष, नगरसेवक अशोक गावडे, नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्यासह 150 ते 200 पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक अशोक गावडे, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख यांचा समावेश आहे. या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे पक्षाला खिंडार पडलं असल्याचं सांगितलं जात आहे. पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांमुळे मागील आठवड्यातच अशोक गावडे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती. आता अखेर त्यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ‘शंभर आचारी रस्सा भिकारी’; भाजपचं यश विरोधकांमुळेच असल्याचा शिवसेनेचा दावा, सांगितली कारणं नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद होती. मात्र, मातब्बर नेते गणेश नाईक यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी कमी झाली. अशातच आता नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीला हा आणखी एक धक्का आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात