Home /News /maharashtra /

Shambhuraj Desai : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर जोरदार टीका

Shambhuraj Desai : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर जोरदार टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेत (shiv sena) मोठी फुट पाडत 40 आमदारांना सुरत, गुवाहाटी आणि गोव्यातून मुंबईला आणत सत्ता स्थापन केली.

  सातारा, 06 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेत (shiv sena) मोठी फुट पाडत 40 आमदारांना सुरत, गुवाहाटी आणि गोव्यातून मुंबईला आणत सत्ता स्थापन केली. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्वाची भूमिका बजावणारे शंभूराज देसाई (satara shambhuraj desai) यांचेही नाव घेतले जाते. शंभूराज देसाई बऱ्याच दिवसानंतर सातारा जिल्ह्यातील आपल्या मतदार संघात आल्यावर पत्रकार परिषद घेत झालेल्या घटनेचा वृत्तांत दिला. ते म्हणाले आम्ही गद्दार नाही 15 लोकांची शिवसेना (shiv sena rebel) की  41लोकांची हे त्यांनी ठरवावे असे म्हणत देसाईंनी ठाकरे घराण्यावर टीका केली.

  शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले की, आम्ही शिवसेना सोडली नाही आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिले आहे. त्यांनी जी काही अडिच वर्षे बडबड केली त्याला कोणीही महत्व देणार नाही. ज्या संजय राऊतामुळे हे सगळ झालं त्याला महत्व देत नसल्याचे देसाई म्हणाले.

  हे ही वाचा : भाजपमध्ये होणार मोठे बदल, चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार, मंत्रिमंडळात लागली वर्णी?

  उद्धव ठाकरे यांनी 15 लोकांची शिवसेना की 41 लोकांची ठरवावे आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे नेण्याचे काम करत आहे. या भावनेतून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जाण्याचे ठरवले आहे. उद्धव ठाकरे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला का यावर ते म्हणाले की आम्ही जिथे राहत होतो तिथे रेंज नसल्याने आमचा फोन लागत नसल्याचे सांगत. देसाई यांनी बोलण्याचे टाळले.

  ते पुढे म्हणाले की, आमची काँग्रेसबाबत कोणतीही तक्रार नाही बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसने आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आम्ही शिंदे साहेबांच्या खांद्यावर मान ठेवली आहे. ते निर्णय घेतील तो मान्य असल्याचे ते म्हणाले. ही महाआघाडी अनैसर्गिक झाली याबाबत आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना माघारी जाऊया असे म्हणत होतो पण त्यांनी ते ऐकलं नाही म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.

  आपल्या मतदारसंघात पिकांची काय परिस्थिती आहे याचे अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिले आहेत. यामुळे मतदार संघात फिरून पाहणी करणार आहे. तसेच जिल्हा पालक सचीव येऊन पिकांची पाहणी करणार असल्याचेही ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री, उपमख्यमंत्री यांच राज्यातल्या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे. युतीचे सरकार कामाला लागले आहे. 

  हे ही वाचा : कोण होणार भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष? 3 नेत्यांमध्ये जोरदार चुरस

  ते पुढे म्हणाले की, ज्या युतीच्या जीवावर मते मागितली. ती तोडून अनैसर्गिक युती कशी करायची हे आम्ही पक्षनेतृत्वाला याबाबत सांगितले होते. आमची पहिल्यापासून आमच्या पक्ष नेतृत्वाकडे युतीसोबत जाण्याची मागणी होती. शिवसैनिकांची मागची अडिच वर्षे शिवसेनेत गळचेपी झाल्याने हा उठाव केल्याचे देसाई म्हणाले.

  केंद्राचं आणि राज्याचे सरकार एक विचारच असेल तर विकास नक्की होतो. त्यासाठी आम्ही पुन्हा युती केली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासावर आम्ही हे सगळं करत आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही त्यांना शब्द दिला आहे शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहू तो आम्ही पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. 

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Sanjay Raut (Politician), Satara, Satara (City/Town/Village), Satara news, Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या